इंधनाचे दर ठरतात तरी कसे? चला जाणून घ्या..

पेट्रोल – डिझेलच्या दरामध्ये भरमसाठ वाढ झाल्याने महागाईचा आग-डोंब उसळला होता. महागाईमुले होरपळत असलेल्या सामान्य नागरिकांना दिलासा मिळावा याकरीता केंद्र सरकारने पेट्रोल- डिझेलवरील उत्पादन शुल्कामध्ये कपात केली. आणि त्यामुळे दोन्ही इंधनांच्या किमती ९ आणि ७ रुपयांनी कमी झाल्या. मुळामध्येच इंधनाच्या किमती ठरतात तरी कशा, चला जाणून घेऊ या.

तेल शुद्धीकरण कारखान्यामधून कच्चे तेल बाहेर पडल्यावर त्याची मूळ किंमत पक्की केली जाते. इंधनाची मूळ किंमत प्रतिलिटर अशी निश्चित केलेली असते. आंतरराष्ट्रीय बाजारामधील कच्च्या तेलाचे दर, शुद्धी-करणाचा खर्च आणि देशांतर्गत बाजारपेठे मधील मागणी इत्यादी घटक त्याकरीता विचारात घेतले जातात. शुद्धीकरण केलेले इंधन पेट्रोल पंपावर पोहोचे पर्यंत त्यामध्ये अनेक खर्च सुद्धा जोडले जातात.

या खर्चांमध्ये तेल वाहतुकीचा खर्च, केंद्र व राज्य सरकारचे कर, डीलरचे कमिशन यांचा समावेश असतो. या सर्वांची एकत्रित बेरीज केल्यावर प्रत्यक्ष पंपावर विकल्या जाणाऱ्या पेट्रोल आणि डिझेलची किंमत ठरवण्यात येते. हा झालेला सर्व खर्च अंतत: ग्राहकाकडून वसूल करण्यात येतो.

👉🏻 कच्च्या तेलाच्या आयातीचा करार झाला असेल, तर संबंधित देशाकडून तेल आयात करण्यात येते.

👉🏻 कच्चे तेल घेतल्याच्या दिवसापासून ते २२व्या दिवशी पेट्रोलपंपांपर्यंत पोहोचते.

👉🏻 समजा जर १ तारखेला कच्च्या तेलाचा व्यवहार केला असेल तर प्रत्यक्षात ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्याला २२ दिवस लागतात.

👉🏻 मूळ किंमत ₹ ५६.३५ वाहतुकीचा खर्च ₹ ०.२० उत्पादन शुल्क ₹ १९.९० डीलरचे कमिशन ₹३.८५व् हॅट ₹ १५.०५ एकूण किंमत ₹ ९५.३५

Similar Posts