मान्सून ३ दिवसांपूर्वी केरळमध्ये दाखल, या तारखेला येणार महाराष्ट्रात..

हवामान खात्याच्या अचूक अंदाजामुळे यंदा मान्सूनने १५ दिवस अगोदरच दार ठोठावले आहे. आज २९ मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे.

Monsoon Update: भयंकर उकाडा आणि कडाक्याच्या उन्हात हवामान खात्याकडून दिलासा मिळाल्याची बातमी आली आहे. हवामान विभागाच्या अचूक अंदाजामुळे यंदा मान्सूनने १५ दिवस अगोदरच दार ठोठावले असून आज २९ मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार येणाऱ्या काही दिवसांत केरळच्या उर्वरित भागासह, मान्सून कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या दिशेने सरकणार आहे.

खरं म्हणजे १ जूनपर्यंत माॅन्सून केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. मात्र, आज २९ मे रोजीच माॅन्सूनचे केरळमध्ये आगमन झालंय. आणि उद्यापासून (ता. ३०) राज्याच्या काही भागात मेघगर्जनेसह पावसाच्या सरी कोसळण्याचा इशारा देण्यात आला आहे.

महाराष्ट्रामध्ये ७ जूनला दाखल होणार..

केरळमध्ये माॅन्सूनने दस्तक दिल्यानंतर पुढील ६ ते ७ दिवसांमध्ये तळ कोकणात अन् नंतर महाराष्ट्रात येत असतो. याप्रमाणे माॅन्सून केरळमध्ये दाखल झाल्याने महाराष्ट्रात ७ ते ८ जूनपर्यंत तो दाखल होऊ शकतो, मात्र, केरळमध्ये दाखल झाल्यानंतर त्याचा पुढील वेग मंदावण्याची शक्यता असल्याचेही अंदाज वर्तविण्यात आले आहे. माॅन्सुन उंबरठ्यावर आलेला असताना, शेतीच्या कामांना वेग आला आहे.

दरम्यान, हवामान विभागाचे अधिकारी के. एस. होसाळीकर यांनीही केरळमध्ये माॅन्सून दाखल झाल्याची बातमी दिली. आपल्या ट्विटमध्ये होसाळीकर यांनी सांगितले, की केरळमधील कन्नूर, पल्लकड आणि मदूराईमध्ये माॅन्सून दाखल झाला असून, तेथे पावसाला सुरुवात झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!