नाशिकमध्ये तयार होणार देशभरातील सर्व ई-पासपोर्ट..

देशभरातील सर्व ई-पासपोर्ट हे नाशिकच्या इंडिया सिक्युरिटी प्रेसमध्ये बनणार आहेत. तशी घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी अर्थसंकल्पात केलीय.

केंद्र सरकारने पासपोर्टची सुरक्षा आणि त्याचा गैरवापर टाळण्यासाठी महत्त्वाची पावले उचलली असून आता अत्याधुनिक चिपच्या मदतीने ई-पासपोर्ट तयार केला जाणार आहे. तसा हा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला होता. या निर्णयावर काल मंगळवारी सादर झालेल्या अर्थसंकल्पातही अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी शिक्कामोर्तब केले.

कसा असेल ई-पासपोर्ट?

केंद्र सरकारने ई-पासपोर्टमध्ये सुरक्षेला जास्त महत्त्व दिले आहे. त्यामुळे पासपोर्टमधील कुठलिही माहिती लिक होणार नाही. त्यावरील डिजिटल स्वाक्षरी सुद्धा सुरक्षित राहील. यासाठी एक विशेष अशी चिप या पासपोर्टमध्ये बसवण्यात येणार आहे. या पासपोर्टशी कोणी छेडछाड केली, तर त्याची माहिती संबंधित यंत्रणेपर्यंत पोहचणार आहे. त्यामुळे या पासपोर्ट गैरवापर टळणार आहे. विशेष म्हणजे यापूर्वी दोन हजारांच्या नोटा चलनात आल्यानंतर त्याची छपाईही नाशिकमध्येच झाली होती. त्यामुळे पुन्हा एकदा एक महत्त्वाच्या कामाची धुरा नाशिकवर येऊन पडली आहे.

विशेष म्हणजे, यापूर्वी दोन हजारांच्या नोटा चलनात आल्यानंतर त्याची छपाईही नाशिकमध्येच झाली होती. आता ‘ई-पासपोर्ट’चा निर्णय झाल्यानंतर त्याची छपाईही नाशिकमध्येच व्हावी, यासाठी खासदार हेमंत गोडसे यांनी प्रयत्न केले. त्यानुसार पुन्हा एकदा महत्त्वाच्या कामाची जबाबदारी नाशिकवर आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!