Kisan Vikas Patra Yojana Government Scheme: सरकारची भन्नाट योजना! ‘या’ योजनेत गुंतवणूक करून दुप्पट पैसे मिळवा, असा करा अर्ज..

Kisan Vikas Patra Yojana

Kisan Vikas Patra Yojana in Marathi: शेतकरी शेतामध्ये कष्ट करून पैसे कमवत असतो. जो शेतातून माल निघेल त्याची विक्री करून शेतकरी आलेली रक्कम एखाद्या बँकेत ठेवतो. जर तुम्हाला मिळालेली रक्कम जर दुप्पट झाली तर किती खास होईल. म्हणजेच 2 लाखांचे 4 लाख रुपये.. शेतकऱ्यांसाठी पोस्टाची जबरदस्त योजना आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांचे पैसे डबल होणार आहे.

सुरक्षित भविष्यासाठी आता प्रत्येक जण काही ना काही गुंतवणूक करीत असतो.. तसेच शेतकरी देखील गुंतवणूक करत आहे. परंतु, ही गुंतवणूक करतानाच, त्यातून चांगला परतावा मिळणंही देखील आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यासाठी अनेक पर्याय आहेत. मात्र, पोस्टाची भन्नाट योजना आहे, ज्या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दुप्पट परतावा मिळणार आहे. (Kisan Vikas Patra Yojana 2022)

सुरक्षित गुंतवणूक व चांगला परतावा हवा असल्यास, पोस्ट ऑफिस योजना सर्वोत्तम पर्याय आहे. पोस्ट ऑफिसमार्फत अनेक जबरदस्त याेजना सुरु करण्यात आल्या आहेत. त्यापैकीच एक म्हणजे, ‘किसान विकास पत्र’ (KVP) योजना.. ही एक अशी बचत योजना आहे, ज्यात पैसे गुंतवल्यास दुप्पटीने पैसे मिळतात. या योजनेची सविस्तर माहिती जाणून घेऊ या.. “KVP Yojana in Marathi”

Kisan Vikas Patra Yojana बाबत..


किसान विकास पत्र योजनेचं नाव ऐकून असं वाटू शकतं की, ही योजना फक्त शेतकऱ्यांसाठी असेल. पण तसं नाही, देशातील कोणताही नागरीक किसान विकास पत्र योजनेचा लाभ घेऊ शकतो. ही भारतातील प्रत्येक नागरिकांसाठी बचत योजना आहे. (Kisan Vikas Patra Post Office)

‘किसान विकास पत्र’ योजना ही एक बचत योजना आहे. या योजनेअंतर्गत गुंतवणूकदाराला 124 महिने म्हणजेच 10 वर्षे, 4 महिने एवढ्या कालावधीसाठी गुंतवणूक करावी लागते. हा कालावधी पूर्ण झाल्यानंतर गुंतवणूकदाराने गुंतवलेल्या पैशांच्या दुप्पट पैसे लाभार्थ्यांना देण्यात येते. या योजनेअंतर्गत सरकार आपल्या गुंतवणुकीवर 6.9 टक्के एवढं वार्षिक कंपाऊंट व्याज देते.

किसान विकास पत्र योजनेत खातं उघडू शकतं?


देशातील कोणताही प्रौढ व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतो.
10 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या अल्पवयीन पाल्याच्या नावानेही खातं उघडून योजनेचा लाभ घेता येईल.
मानसिक दृष्ट्या दिव्यांग असलेल्या व्यक्तीच्या नावे त्याचे पालक खातं उघडू शकतात.
जास्तीत जास्त तीन व्यक्ती संयुक्त खातं उघडू शकतात. (Kisan Vikas Patra Scheme)

योजनेत किती गुंतवणूक करू शकता?


किसान विकास पत्र योजनेअंतर्गत 1 हजार रुपयांपासून ते आपल्याला हवी तेवढी रकमेची गुंतवणूक करता येते. जर तुम्ही 50 हजार रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक करत असल्यास पॅन कार्डची माहिती जमा करावी लागते. योजनेत गुंतवली जाणारी रक्कम ही 10 लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यास गुंतवणूकदाराला आपल्या उत्पन्नाच्या स्त्रोताबद्दल माहिती द्यावी लागते.

किसान विकास पत्र योजनेत खातं उघडण्याचे पर्याय..


सिंगल होल्डर टाईप अकाउंट – हे खातं प्रौढ व्यक्ती स्वतःसाठी उघडू शकतात. आपल्या अल्पवयीन किंवा मानसिक दृष्ट्या दिव्यांग असलेल्या पाल्याचं खातं उघडण्यासाठी देखील आई-वडिलांना परवानगी आहे.

जॉईंट ए टाईप – हे एकप्रकारे संयुक्त खातं आहे. यामध्ये जास्तीत जास्त तीन व्यक्ती आपलं संयुक्त खातं सुरू करू शकतात. या प्रकारात खात्यातील पैसे काढण्यासाठी तिघांना अधिकार असतो.

जॉईंट बी टाईप – या प्रकारातही जास्तीत जास्त तीन व्यक्ती संयुक्त खातं उघडू शकतात. परंतु, पैसे काढण्याचे अधिकार कोणत्याही एका व्यक्तीकडेच असते.

Kisan Vikas Patra Yojana असा करा अर्ज..


किसान विकास पत्र खातं उघडण्यासाठी कोणत्याही जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये किंवा बँकेत जाऊन तुम्हाला ऑफलाईन अर्ज करता येईल. योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही ऑनलाईन व ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता. अर्ज करण्यासाठी कागदपत्रे कोणती लागतात जाणून घेऊ या..

आवश्यक कागदपत्रे


KVP अप्लीकेशन फॉर्म
आधार कार्ड
रहिवासी दाखला
वयाचं प्रमाणपत्र
पासपोर्ट फोटो (Kisan Vikas Patra Yojana Online Application)

ऑनलाईन अर्ज..


सर्वप्रथम https://www.indiapost.gov.in/ या वेबसाईटवर जा.
येथे डाव्या बाजूला मेन्यू दिसेल. तिथे Banking and Remittance पर्यायावर क्लिक करा.
यानंतर, ‘पोस्ट ऑफिस सेव्हिंग स्किम’ पर्यायावर क्लिक करा.
आता तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल. येथे आपल्यासाठी KVP योजना निवडण्याचा पर्याय उपलब्ध आहे.
यानंतर, ‘फॉर्म्स अव्हेलेबल’ पर्यायावर क्लिक करून Application form for purchase of certificate डाऊनलोड करून घ्या.
आता फॉर्म भरून, आवश्यक कागदपत्रे जोडून फॉर्म सबमिट करा. तुमचं खातं तयार होऊन जाईल.

हे देखील वाचा-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!