वैजापूर तालुक्यामध्ये दोन गटात तुंबळ हाणामारी; वृद्धाला काठीने अमानुष मारहाण, भयावह घटनेचा व्हिडिओ व्हायरल..

औरंगाबाद जिल्ह्यामधील वैजापूर तालुक्यात असलेले बिलोनी या गावात दोन गटात शेत जमिनीच्या वादातून तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. कुटुंबातील एका सदस्याने या घटनेचा व्हिडीओ आपल्या मोबाइलमध्ये शूट केला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात वेगानं व्हायरल होतं आहे.

दोन्ही गटातील लोकांनी काड्यांनी व शेतात पडलेल्या दगडानी एक दुसऱ्याला मारहाण केली. या मारहाण प्रकरणी दोन्ही गटातील नागरिकांनी एकमेकांविरोधात शिवुर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली, पोलिसांनी दोन्ही गटांविरोधात गुन्हा दाखल केला असून व्हायरल व्हिडीओच्या आधारे तपास केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वैजापूर तालुक्यामधील बिलोनी गावातील दोन गटात गेल्या काही दिवसांपासून शेतीवरून वाद सुरू होता. याच वादाचे रुपांतर हाणामारीत झाले आहे. या मारहाणीत जखमी झालेल्यांवर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

ही घटना घडताच बिलोनी गावात तणावाचं वातावरण निर्माण झालं होते. हा वाद आणखी वाढू नये, यासाठी गावात काटेकोर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, काहीजण एका वृद्ध माणसाला काठीने बेदम मारहाण करत आहेत. यावेळी महिला आणि तरुण मुलीदेखील दगडफेक करताना दिसत आहेत. तसेच समोरील गटाने एका महिलेला देखील खाली पाडून काठीने मारहाण केली आहे. या संतापजनक घटनेचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियात वेगानं व्हायरल होतं आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!