चित्तथरारक पणे पाठलाग करुन पो. ठाणे पुंडलिकनगर हद्दीत झालेल्या घरफोडी गुन्हे शाखेकडुन उघड; 15,78,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त.

औरंगाबाद: दिनांक 17/07/2022 रोजी गुन्हे शाखेच्या अजित दगडखैर, पोलीस उप निरीक्षक यांचे पथकाला बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, पुंडलिकनगर हद्दीमध्ये झालेल्या घरफोडीचे आरोपी हे जालना ते औरंगाबाद रोडवर गुन्ह्यातील चोरी केलेल्या लाल रंगाच्या टाटाग टियागो कारने येणार आहे. अशी पक्की माहिती मिळाल्यावरून सदर माहिती वरिष्ठांना कळवुन, कॅम्ब्रिज चौक येथे पंच व पथक यांना सदर गाडीचे वर्णन सांगून सापळा लावून उभे असतांना गुन्हे शाखेच्या पथकाला 11.30 वाजेच्या सुमारास माहिती मिळालेल्या वर्णनातील लाल रंगाची टियागो गाडी झाल्टा फाट्याकडून कडून येणाऱ्या पुलावर दिसली.

सदरील गाडी चिकलठाणा कडे न वळवता नारेगाव रोडवर गेल्याने गुन्हे शाखेच्या पथकाने पंच व पथकासह सदरील गाडीचा पाठलाग सुरु केला, गाडीच्या चालकास पाठलाग करत असल्याचे लक्षात आल्याने चालकाने गाडीचा वेग आणखी वाढवला परंतु गाडीवरचे नियंत्रण सुटुन गाड़ी रोडलगत उतार असलेल्या सहान जागेवर जाऊन फसली. पंच व पथक त्यांच्या मागेच असल्याने पथकाने वाहन तात्काळ रोडवर उभे केले असता पोलिसांना पाहून टियागो कारमधील आरोपी हे पळून जात असतांना पोलिसांनी त्यांचा पाठलाग पकडले.

त्यांना त्यांचे नाव गाव विचारता दोघेही विधी संघर्ष बालक यांच्या ताब्यातून शिवाजीनगर, 12 वी योजना, औरंगाबाद येथुन चोरलेली टियागो कंपनीची लाल रंगाची कार घराची कडी – कोयंडा तोडुन चोरीकेलेले सोने-चांदीचे दागिणे इत्यादी एकूण 15,78,000 / – रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करून दोन्ही विधी संघर्ष बालके असल्यामुळे त्यांच्या आई-वडीलांना पोलीस ठाणे पुंडलिकनगर येथे हजर राहण्याचे बजावून विधी संघर्ष बालकांना मुद्देमालासह पोलीस ठाणे येथे हजर करुन सदरचा गुन्हा उघडकीस आणला.

सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त डॉ . निखील गुप्ता, मा. पोलीस उप आयुक्त अपर्णा गिते, मा. सहायक पोलीस आयुक्त गुन्हे विशाल ढुमे यांच्या मार्गदर्शनाखाली मा. पोलीस निरीक्षक गुन्हे अविनाश आघाव, सपोनि / काशीनाथ महांडुळे, पोलीस उप निरीक्षक अजित दगडखैर, सफी / रमाकांत पटारे , पोअं / सुनिल बेलकर, अजय दहिवाळ, विजय घुगे, धनंजय सानप, दत्तात्रय गडेकर, ज्ञानेश्वर पवार, महिला अंमलदार पुनम पारधी, प्रिती इलग, आरती कुसळे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!