महिलेला झाला सर्पदंश, सापाला घेऊन महिलेने गाठले रुग्णालय.

औरंगाबाद: सापाने चावा घेतल्यानंतर महिलेने धाडसाने त्या सापाला पकडले अन् प्लास्टिकच्या बाटलीत कैद केले. ती बाटली घेऊन ती महिला त्याच अवस्थेत चिकलठाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात आली. साप घेऊन महिला आल्याने एकच खळबळ उडाली. तिला तातडीने उपचारासाठी दाखल करून घेण्यात आले.

सर्पदंश झालेल्या महिलेने चावलेल्या सापाला घेऊन चिकलठाण्याचे जिल्हा रुग्णालय गाठले. त्यामुळे रुग्णालयात एकच खळबळ उडाली. डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून तिला घाटीत रेफर केले. काल, १६ जुलैला हा प्रकार समोर आला.

प्राथमिक उपचार करून घाटी रुग्णालयात हलविण्यात आले. याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक पद्मजा सराफ यांनी सांगितले, की सर्पदंश झालेले अनेक रुग्ण सोबत साप घेऊन येतात. कोणी बाटलीत तर कुणी पिशवीत साप आणते. कोणत्या सापाने चावले हे कळून उपचार करायला सोपे जावे असा त्यांचा उद्देश असतो. ही महिलाही साप घेऊन आली होती. पण यामुळे रुग्णालयात भीती पसरली.

Similar Posts