शीsss! तुम्ही खात असलेली भाजी गटारात धुतलेली तर नाही ना? किळसवाणा व्हिडीओ समोर! भाजी विक्रेत्यावर गुन्हा दाखल..
वर्धा जिल्ह्याच्या हिंगणघाट येथे एक भाजी विक्रेता चक्क गटाराच्या घाण पाण्यात भाजी धुवत असल्याचा किळसवाणा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नागरिकांनी एकच संताप व्यक्त केला आहे.
याप्रकरणी भाजी विक्रेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून तो भाजी विक्रेता सांडपाणी वाहून नेणाऱ्या गटाराच्या पाण्यात भाजी धुवत असल्याचा व्हिडीओ गुरुवारी व्हायरल झाला होता. त्यानंतर भाजी विक्रेत्यांबाबत तीव्र संताप व्यक्त करण्यात येत होता. अखेर याप्रकरणी गंभीर दखल घेण्यात आली. हिंगणघाट नगरपालिकेचे प्रशासक सतीश मासाळ यांनी पोलीस तक्रार केल्यावर पोलिसांनी त्या भाजी विक्रेत्याविरोधामध्ये गुन्हा दाखल केला.
आहे तरी काय त्या व्हिडीओमध्ये?
एका नागरिकाने वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट शहरात शुभम टामटे नावाच्या भाजीविक्रेत्याच्या सांडपाण्याच्या गटारात भाजी धुतांनाचा व्हिडिओ आपल्या मोबाइलच्या कॅमेऱ्यात कैद करून सोशल मीडियावर व्हायरल केला होता. गलिच्छ पाण्यात भाजी धुत असलेला भाजीविक्रेता शहराच्या डांगरी वार्डामधील रहिवासी आहे.
पाहा व्हिडिओ..