सम-लैंगिक संबंधातून मारहाण करून कक्षसेवकाची हत्या, व्हिडिओ बनवून पैशासाठी ब्लॅकमेल केले; 7 जणांवर गुन्हा दाखल..

बुलढाणा : जिल्ह्यातील धामणगाव बढे येथील श्रीराम शेळके या 47 वर्षीय कक्षसेवकाचा समलैंगिक संबंधातून हत्या केल्याची धक्कादायक घटना बुलढाणा शहर पोलिसांनी उघडकीस आणली आहे.

या हत्या प्रकरणी बुलडाणा शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून हत्या करणाऱ्या 7 आरोपींना अटक करण्यात आली असून श्रीराम पांडुरंग शेळके असे खून झालेल्या कक्षसेवकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार बुलडाणा येथे रात्री 10:30 वाजेच्या सुमारास मलकापूर रोडवर असलेल्या बालाजी मंदिराच्या कमानीजवळील एका मोकळ्या शेतामध्ये एक व्यक्ती बेशुद्ध असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी जखमी अवस्थेमध्ये त्या व्यक्तीला आधी बुलढाणा व त्यानंतर औरंगाबाद येथील रुग्णालयात दाखल केले होते. 16 एप्रिल रोजी औरंगाबाद येथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. सहाय्यक पोलीस निरीक्षक जयसिंग पाटील यांनी केलेल्या तपासमध्ये खून झाल्याचे उघड केले आहे.

असा केला उलगडा…

तपासादरम्यान मृत श्रीराम शेळके यांच्या कुटुंबीय व ते काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांची चौकशी केली. त्यावेळी मागील 3 महिन्यांपासून श्रीराम शेळके यांना सतत कुणाचा तरी फोन येत होता, फोनवर बोलल्यानंतर शेळके हे अस्वस्थ व्हायचे असे आले. नंतर पोलिसांनी सायबर पोलिसांची मदत घेऊन महत्वपूर्ण माहिती गोळा केल्यावर ह्या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला.

सम-लैंगिक संबंधांतून झाली हत्या…

मृत श्रीराम शेळके हे जालना जिल्ह्यामधील भोकरदन तालुक्यात असलेले पिंपळगाव रेणुकाई येथे कक्षसेवक पदावर कार्यरत होते. काही महिन्यांपूर्वी त्यांची फेसबुकद्वारे बुलडाणा शहरात सावित्रीबाई फुले नगरमध्ये राहणाऱ्या आनंद गवई (वय 19) याच्याशी ओळख झाली. दोघांमध्ये फेसबुकवर चॅटिंग करत असताना दोघांनी एकमेकांचे मोबाईल नंबर घेतले. त्यानंतर दोघांमध्ये सतत मोबाईलवर बोलणे व्हायचे. दोघे WhatsApp वर सम-लैंगिक मॅसेज, फोटो व व्हिडिओची देवाणघेवाण करत होते. त्यामुळे त्यांच्यामध्ये बरीच जवळीक निर्माण झाली.

नंतर त्यांच्या मध्ये सम-लैंगिक संबंध स्थापित झाले व सदरील संबंधाचे व्हिडीओ देखील काढण्यात आले. नंतर ते व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन कक्षसेवकाला खंडणी मागण्यांचे प्रकार सुरू झाले. त्यावरून शेळके हे सतत चिंतेमध्ये होते.

एके दिवशी श्रीराम शेळके यांना या सर्व आरोपींनी मिळून बुलडाणा येथे बोलावले व त्यातीलच एका आरोपीच्या घरी रात्रीच्या सुमारास निर्दयपणे मारहाण केली आणि कार मध्ये नेऊन बुलडाणा शहरानजीक असलेल्या शेतात फेकून दिले.

मात्र नंतर श्रीराम यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तांत्रिक तपासानंतर पोलिसांनी आधी संशयित म्हणून आनंद गवईला ताब्यात घेतल्यावर केलेल्या चौकशीनंतर त्याने सर्व घटना पोलिसांना सांगितली. त्यानंतर गुन्हे शोध पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश लोधी व त्यांच्या पथकाने उर्वरित 6 आरोपींना एकाच वेळी शहरातील वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेतले. सर्व आरोपींची चौकशी केल्यानंतर त्यांनी गुन्हा कबूल केला.

आनंद कुणंद गवई (19, रा. सावित्रीबाईफुले नगर), शाश्वत रमेश खंडायता (19 रा. बजरंगनगर), आदेश सुनील राठोड (रा. क्रीडा संकूल परिसर), चेतन गुलाबराव वावरे (20, रा. वावरे ले आऊट), संतोष रमेश शर्मा (22, संभाजी नगर), दीक्षांत नवघरे (रा. जुना गाव), कुंदन राम बेंडवाल (26, रा. रामदेवनगर) या सात जणांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले आहेत. सर्व आरोपींना 5 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!