थोडा इंटरटेन्ट हो ना चाहिए यार..” असे म्हणत सुप्रिया सुळेंनी उडवली राज ठाकरेंच्या सभेची खिल्ली.

औरंगाबाद: आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. या दौऱ्या-दरम्यान सुप्रिया सुळेंनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची खिल्ली उडवली आहे.

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे

तो येईल, भाषण देईल, आणि निघून जाईल, तुम्ही तुमचे काम करा ना, असं म्हणतं सुप्रिया सुळेंनी कार्यकर्त्यांना काम करण्याचं आवाहन केलं. त्याला (राज ठाकरेंना) इतके महत्व देता कशाला, असं सुद्धा त्या म्हणाल्या आहेत. थोडं इंटरटेन्ट पण होऊ द्या ना, असं म्हणत सुप्रिया सुळेंनी राज ठाकरे यांच्या सभेवर टोला मारला आहे.

थोडे मनोरंजन पण व्हायला हवे, सिरीयस पिक्चर पण किती, असं म्हणत त्यांनी राज ठाकरे यांची खिल्ली उडवली आहे. दूरदर्शन किती पहायचे कधी-कधी आपण इतर चॅनेल पण पाहत जा ना यार, राज ठाकरे यांची औरंगाबादमध्ये 1 मे रोजी सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर जाहीर सभा घेणार असल्याची घोषणा राज ठाकरे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!