अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशांसाठी संभाव्य वेळापत्रक जाहीर..
माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयातर्फे यावेळेसच्या ११वी साठी online प्रवेश प्रक्रियेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. १७ मे पासून विद्यार्थ्यांना ११वी प्रवेशा साठीच्या अर्जाचा पहिला भाग आणि दुसरा भाग दहावीचा निकाल लागल्यानंतर भरता येणार असून यावेळेस प्रवेशाच्या नियमित ३ व १ विशेष फेरी राबविण्यात येणार आहे. प्रथम येणाऱ्याला प्रथम प्राधान्य (एफसीएफएस) फेरी ऐवजी waiting यादी लावण्यात येणार असल्याचे संचालनालया तर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
मुंबई महानगर क्षेत्र, पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रांसह औरंगाबाद, नाशिक, अमरावती व नागपूर महानगरपालिका क्षेत्रांमधील ज्युनिअर कॉलेजांमध्ये ११वीचे प्रवेश केंद्रीय online प्रवेश प्रक्रियेद्वारे होतात.
गेल्या शैक्षणिक वर्षाची ११वी प्रवेश प्रक्रिया ३१ डिसेंबर २०२१ रोजी पूर्ण झालेली असून
राज्य मंडळाची १०वीची परीक्षा ४ एप्रिलला संपली आहे. त्यामुळे १०वी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता येणाऱ्या २०२२-२०२३ शैक्षणिक वर्षामधील प्रवेश प्रक्रियेची पूर्वतयारी सुरू झाली आहे.
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक महेश पालकर यांनी विभागीय उपसंचालकांना दिलेल्या सूचनानुसार, ११वी केंद्रीय online प्रक्रिया २०२२-२३ साठी पूर्वतयारी त्वरित सुरू करण्यात यावी व त्यासाठी प्रवेश प्रक्रियेचे टप्पे समजावून घेऊन, त्यानुसार नियोजन करावे.
विद्यार्थी व पालक यांच्यासाठी मार्गदर्शन वर्ग आयोजित करावेत, शाळा मार्गदर्शन केंद्रांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन करावे, अशा सूचना सुद्धा देण्यात आल्या आहेत. त्यामुळे ११वी प्रवेशांची तयारी येणाऱ्या महिन्यात सुरू होणार असून, विद्यार्थ्यांनी अचूक अर्ज भरण्यासाठी सरावाची प्रक्रियासुद्धा होणार आहे.
अधिक माहितीसाठी विद्यार्थी आणि पालकांनी https://11thadmission.org.in/ या वेबसाइटला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
११वी प्रवेशाचे संभाव्य वेळापत्रक खालीलप्रमाणे
▪️विद्यार्थी, पालक, कनिष्ठ महाविद्यालये यांचे मार्गदर्शन : एप्रिल २०२२
▪️अर्जाचा भाग १ भरणे (सराव) : १ ते १४ मे
▪️विद्यार्थ्यांसाठी वेबसाइटवर नोंदणी, अर्ज भाग एक भरणे व तपासणे : १७ मे पासून १०वीच्या निकालापर्यंत
▪️ज्युनिअर कॉलेज नोंदणी : २३ मे पासून १०च्या निकालापर्यंत
▪️अर्जाचा भाग २ भरणे : दहावी निकाल लागल्यापासून पुढील ५ दिवस
▪️कोटा आंतर्गत राखीव जागांवरील प्रवेश सुरू : १०वी निकालानंतर पुढील ५ दिवस
▪️प्रवेश फेऱ्या व अॅलॉटमेंट प्रवेश
▪️नियमित फेरी १ : १० ते १५ दिवसांचा कालावधी