व्यवसाय करू इच्छिणाऱ्या महिलांना मिळेल सरकारच्या ‘या’ पाच योजनांची मदत; नाही भासणार पैशांची कमतरता.

भारतामध्ये अनेक महिला उद्योजिका असून अनेक महिलांना स्वत:चा उद्योग सुरू करण्याची जिद्द आहे. व्यवसाय सुरू करण्याचा मार्ग महिलांसाठी खूपच कठीण आहे. म्हणूनच, महिला व्यावसायिकांच्या समर्पक गरजा पूर्ण करून त्यावर उपाय शोधणे ही काळाची गरज आहे. म्हणून देशातील महिलांना व्यवसायांसाठी चालना मिळावी म्हणून सरकारने महिलांसाठी विविध योजना जाहीर केल्या आहेत. जाणून घ्या सरकारच्या अशा पाच योजना..

अन्नपूर्णा योजना

अन्नपूर्णा योजनेंतर्गत, केंद्र सरकार फूड केटरिंग व्यवसायासाठी 50 हजार रुपयांपर्यंतचे कर्ज देत असून ज्या महिलांना फूड केटरिंगचा व्यवसाय करण्याची इच्छा आहे त्यांना भांडी खरेदी, गॅस कनेक्शन, फ्रीज, मिक्सर, टिफिन बॉक्स, डायनिंग टेबल या वस्तू खरेदी करण्यासाठी करता येतो. अन्नपूर्णा योजनेंत कर्ज घेण्यासाठी जामीनदार आवश्यक आहे. कर्जाची रक्कम 36 महिन्यांत म्हणजे 3 वर्षांत परत करावी लागेल. अन्नपूर्णा योजनेतील कर्जावरील व्याजदर बाजारानुसार ठरविला जातो. सध्या या योजनेचा लाभ SBI कडून घेता येतो.

प्रधानमंत्री मुद्रा योजना

छोट्या उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रधानमंत्री मुद्रा योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेत 50 हजार ते 50 लाख रुपयांचे कर्ज उपलब्ध असून कोणत्याही राष्ट्रीय बँकेतून कर्ज घेता येते. या कर्जाच्या मदतीने महिलांना स्वत:चा व्यवसाय सुरू करू शकतात. या योजेतंर्गत 10 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी जामीनदाराची आवश्यकता नाही. मुद्रा योजनेत 3 प्रकारच्या योजनांचा समावेश आहे.
शिशू: या योजनेमध्ये नवीन व्यवसायासाठी वार्षिक 12% व्याजदराने 50 हजार रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते. कर्जाची परतफेड 5 वर्षांत करावी लागेल.
किशोर: या योजनेमध्ये आधीपासून चालू असलेल्या व्यवसायाच्या विस्तारासाठी 50,000 ते रु. 5 लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध आहे. कर्जाची ठेव आणि व्याजदर बँक क्रेडिट इतिहासाच्या आधारे ठरवतात.
तरुण : या योजनेमध्ये व्यवसाय वाढवण्यासाठी 5 लाख ते 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध आहे. कर्ज ठेवी आणि व्याजाचा दर बँक क्रेडिट इतिहासावरून ठरवते.

स्त्री शक्ती पॅकेज

स्त्री शक्ती पॅकेज अशा महिलांसाठी आहे, ज्यांचा व्यवसायात 50% पेक्षा जास्त हिस्सा आहे. राज्याच्या उपक्रम विकास कार्यक्रमात नोंदणी केलेल्या महिलांचाही या योजनेत समावेश आहे. स्त्री शक्ती पॅकेजमध्ये सुरुवातीपासून 50 हजार ते 2 लाख रुपयांचे कर्ज दिले जाते. एमएसएमईमध्ये नोंदणीकृत कंपन्यांना 25 लाखांपर्यंत कर्ज मिळते. 5 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी कोणत्याही सुरक्षिततेची आवश्यकता नाही. कर्जाच्या व्याजदरातही सूट आहे. स्त्री शक्ती पॅकेजचा लाभ स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) कडून उपलब्ध आहे.

महिला उद्यम निधी

महिला उद्योजकांना आर्थिक मदत करण्यासाठी पंजाब नॅशनल बँक (PNB) आणि स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया (SIDBI) यांनी महिला उद्यम निधी सुरू केला. यामध्ये 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध आहे. 10 लाखांच्या कर्जाची परतफेड करण्यासाठी 10 वर्षांच्या कालावधीत काम केले जाते. बाजाराच्या आधारे व्याजदर ठरवले जातात. या योजनेअंतर्गत, SIDBI कडून ब्युटी पार्लर, डे केअर सेंटर, ऑटो रिक्षा, बाइक आणि कार खरेदी करण्यासाठी वेगवेगळ्या योजना आणि प्रशिक्षण दिले जाते.

महिला समृद्धी योजना

आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या महिलांना पुढे नेण्यासाठी महिला समृद्धी योजना सुरू करण्यात आली. व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणाऱ्या खर्चासाठी बँका 60,000 रुपयांपर्यंत कर्ज देतात. कर्जाचा कालावधी 3 वर्षे 6 महिने आहे. यावर वार्षिक 4% दराने व्याज द्यावे लागेल. बीपीएल धारक महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात. त्यासाठी कोणत्याही हमीदाराची किंवा सुरक्षिततेची गरज नाही.

Similar Posts