मतदान ओळखपत्र आणि आधार लिंक होणार, १ ऑगस्टपासून प्रक्रियेला सुरुवात; महाराष्ट्र ठरणार पहिलं राज्य..!

केंद्रीय निवडणूक आयोगानं महत्वाचा निर्णय घेऊन मतदान कार्डाशी आधार कार्ड लिंक करण्याचं ठरवलं आहे. या मोहिमेला १ ऑगस्ट 2022 पासून सुरुवात होणार आहे…

आधार आणि पॅन कार्ड लिंक करण्याच्या निर्णयाच्या नंतर आता आधार कार्ड आणि मतदार ओळखपत्र लिंक (Aadhar Voter card Link) करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला असून त्याबाबतचे निर्देशही देण्यात आलेले आहेत. आधार कार्ड आणि मतदान ओळखपत्र लिंक करण्याची प्रक्रिया येत्या 1 ऑगस्ट 2022 पासून निवडणूक आयोगाच्या या मोहिमेला सुरुवात होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाचे (Election Commission) प्रमुख निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी पत्रकार परषद घेऊन ही माहिती दिली असून देशपांडे यांनी देशवासियांना 1 ऑगस्ट 2022 पासून आपलं मतदान ओळखपत्र (Voter ID) आणि आधार कार्ड (Adhar card) लिंक करण्याचं आवाहन केले आहे.

पुढे बोलतांना श्रीकांत देशपांडे म्हणाले की, निवडणूक कायद्यामध्ये अलीकडच्या काळात काही बदल करण्यात आले असून हे सर्व बदल 1 ऑगस्ट 2022 पासून देशामध्ये लागू होणार आहे. शिवाय, सदरील प्रक्रिया एप्रिल 2023 पर्यंत सुरु राहणार आहे. या प्रक्रियेत मतदारांनी योग्य माहिती देणे महत्वाचं असून यातील गोपनियता कुणी भंग केल्यास त्याच्यावर कठोर कारवाई केली जाणार असून.म कायद्याचं कठोर बंधन निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांनाही लागू असणार आहे.

कोणकोणते होणार बदल?

● यापूर्वी 1 जानेवारी मतदार क्वालिफाईंगची तारीख होती. पण आता दर 3 महिन्याचा पहिला दिवस हा क्वालिफाईंग तारीख असेल.
● पोस्टल मतदान करताना या मध्ये स्पाऊस हा शब्द वाढवण्यात आला असून आता जो अधिकार पतीला तोच अधिकार पत्नीला असणार आहे.
● मतदार यादीमधील मतदारांचे आधार कार्डबरोबर लिंकअप करण्यात येणार आहे. आधार कार्ड आणि मतदान कार्ड संबंधित मतदारांना सर्व सुविधा मिळाव्यात हा त्यामागील हेतू आहे. आधार कार्डमुळे योग्य मतदान ओळखता येणार असून जर आधार कार्ड नसेल तर 11 पैकी एक कागदपत्र मतदाराला बाळगणं आवश्यक असेल.

उद्या होणार राजकीय पक्षांची आणि निवडणूक आयोगाची बैठक

उद्या सर्व राजकीय पक्ष आणि निवडणूक आयोगाची बैठक होणार असून या बैठकीमध्ये या सर्व बदलांची माहिती पक्षांना देण्यात येणार आहे. आणि कोणताही आधार क्रमांक पब्लिक डोमेनमध्ये जाणार नाही याची सुद्धा खबरदारी घेण्यात येणार असं देखील निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

तर दुसरीकडे निवडणूक कायदा (सुधारणा) कायद्याला आव्हान देणारे काँग्रेस नेते रणदीप सिंग सुरजेवाला यांना सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने मतदार यादी आधारशी जोडण्याच्या तरतुदीला आव्हान देत उच्च न्यायालयात जाण्यास सांगितले. न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड आणि एएस बोपण्णा यांच्या खंडपीठाने सुरजेवाला यांच्या वकिलाला विचारले की त्यांनी यापूर्वी उच्च न्यायालयात धाव का घेतली नाही. खंडपीठ म्हणाले, तुम्ही दिल्ली उच्च न्यायालयात का जात नाही? तुमचाही तोच उपाय असेल. तुम्ही निवडणूक कायदा (सुधारणा) कायदा, २०२१ च्या कलम ४ आणि ५ ला आव्हान देत आहात. इथे का आलात? तुम्ही दिल्ली उच्च न्यायालयात जाऊ शकता.

काँग्रेस नेत्याची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी सांगितले की, पुढील सहा महिन्यांत तीन वेगवेगळ्या राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. “कायद्यात उपलब्ध उपाय लक्षात घेऊन, आम्ही याचिकाकर्त्याला अनुच्छेद 226 (संविधानाच्या) अंतर्गत सक्षम उच्च न्यायालयासमोर याचिका दाखल करण्याचे स्वातंत्र्य देतो,” असे खंडपीठाने सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!