पेट्रोल टाकल्यावर मोटारसायकल पुढे घेण्यावरून वाद, पंपावरच एकमेकांची कॉलर पकडून तुफान राडा..

औरंगाबाद शहरातील सेवन हिल जवळच्या पेट्रोल पंपावर तुफान राडा झाला. पेट्रोल पंपावर काही जण पेट्रोल भरण्यासाठी आले. पेट्रोल पंपावर काही तरुणांनी गाडीत पेट्रोल भरलं. पेट्रोल भरल्यावर गाडी पुढे घेण्या सारख्या शुल्लक कारणावरुन वाद झाला. यानंतर वाद इतका वाढला की आणि दोन गट एकमेकांवर अक्षरशः तुटून पडले. पेट्रोल पंपामध्ये झालेल्या या मारामारीच्या घटनेनं एकच गोंधळ उडाला.

सविस्तर माहिती अशी की, शहरातील सेवन हिल परिसरातील पेट्रोल पंपावर गाडी पुढे घेण्याचा सुरुवातीला वाद झाला. वाद विकोपाला जाऊन दोन गटात फ्रीस्टाईल मारामारी झाली. पेट्रोल पंपावर यावेळी एकच गोंधळ उडाला. यावेळी पेट्रोल पंपावर उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी या घटनेचा व्हिडीओ आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केलाय.

या घटनेची माहिती मिळाल्यावर पोलिसांनीही एकूण सहा ते सात तरुणांना ताब्यात घेतलंय.

राड्याच्या या व्हिडीओ मध्ये काही जण एकमेकांची गच्ची पकडून एकमेकांना मारत असल्याचं दिसून येत आहे. यावेळी एक जनाला खाली पडून त्याला लाथा बुक्क्यांनीही मारहाण करण्यात आली. त्यानंतर दुसरे तरुण सुद्धा एकमेकांशी भिडले. पळापळ, आरडाओरडा आणि हाणामारी असा सगळा प्रकार व्हिडीओमध्ये कैद झालाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!