पैठण रस्त्यावर ईसारवाडी फाटा येथे टँकर- स्कुल बस- ट्रॅव्हलचा तिहेरी अपघातात 10 जखमी

देवगाव तारोडी तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर येथील वऱ्हाड लग्नासाठी स्कूल बसने (MH 17 BD 104) बिडकिन येथे जात असताना ईसारवाडी फाट्याजवळ त्यांच्या समोर चालत असलेल्या भारत पेट्रोलियमच्या (MH 12 KP 4392 ) टँकरने अचानक उजवीकडे वळण घेतल्यामुळे स्कूल बसच्या चालकाने ब्रेक लावले.

स्कूल बसच्या चालकाने अचानक ब्रेक लावल्यामुळे मागून येणाऱ्या पर्पल कंपनीच्या ट्रॅव्हल क्रमांक MH 12 RN 8195 च्या चालकाला गाडीला नियंत्रण न करता आल्याने त्याने समोरील स्कूल बसला धडक दिली. ट्रॅव्हल्स ने स्कूल बसला धडक दिल्यानंतर स्कूल बस समोर असलेल्या टँकर वर धडकली

या तिहेरी अपघातामध्ये दुर्योधन भगवान जाधव 40 वर्षे, शेषराव उत्तम काळे 36 वर्षे, बाबासाहेब वाल्हेकर 28 वर्षे, राहुल वाल्हेकर 28 वर्षे, विनोद धोंडीराम काळे 30 वर्षे, शिवाजी देवा बोरुळे 55 वर्षे, कौसल्याबई उत्तम पाथ 50 वर्षे, हे जखमी झाले असून यातील 7 जणांना गंगापूर येथील शासकीय रुग्णालयात तर तीन गंभीर जखमींना उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जखमींच्या मदतीसाठी डॉ. प्रशांत पोपटराव पंडुरे व पायलट सचिन कराळे भेंडाळा 108 यांनी विशेष सहकार्य केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!