Ola Electric Car लवकरच लॉन्च होणार, भाविश अग्रवालने केला टीझर रिलीज, टाटा मोटर्सला मिळणार काट्याची टक्कर..

Ola Electric Car : इलेक्ट्रिक टू व्हीलर क्षेत्रात मोठे यश मिळविल्यानंतर आता ओला इलेक्ट्रिकने ऑटो क्षेत्रातील इलेक्ट्रिक कार सेगमेंटमध्ये प्रवेश करण्याची तयारी पूर्ण केली आहे. कंपनीने काही ग्राहकांना ओला ग्राहक दिनी म्हणजेच 19 जून रोजी तामिळनाडूमधील उत्पादन युनिटला भेट देण्यासाठी आमंत्रित केले होते.

त्या भेटीदरम्यान, कंपनीचे सीईओ भावीश अग्रवाल यांनी लवकरच लॉन्च होणार्‍या ओला इलेक्ट्रिक कारचा टीझर रिलीज केला. ओला इलेक्ट्रिक कारचा रिलीज झालेला टीझर 30 सेकंदांचा असून त्यामध्ये या इलेक्ट्रिक कारचे डिझाइन आणि इतर माहिती मिळत आहे.

ओला या इलेक्ट्रिक कारच्या लॉन्च तारखेबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही, परंतु रिपोर्ट्सनुसार, कंपनी दिवाळीच्या सणासुदीत ही कार सादर करू शकते. जर तुम्ही देखील ओलाच्या इलेक्ट्रिक कारच्या लॉन्चची वाट पाहत असाल, तर या इलेक्ट्रिक कारची क्षमता, रेंज, वैशिष्ट्ये आणि स्पेसिफिकेशनची संपूर्ण माहिती येथे जाणून घ्या.

ओला इलेक्ट्रिकने जारी केलेल्या 30 सेकंदांच्या टीझरमध्ये कंपनीने तीन कारची झलक दाखवली आहे, याचा अर्थ कंपनी हॅचबॅक, सेडान आणि एसयूव्ही सेगमेंटमध्ये एकाच वेळी तीन इलेक्ट्रिक कार लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.

ओला इलेक्ट्रिकने आपली इलेक्ट्रिक हॅचबॅक, सेडान आणि एसयूव्ही लाँच केली, तर टाटा मोटर्स, एमजी मोटर्स आणि किया मोटर्ससाठी सर्वात मोठे आव्हान असणार आहे. एका रिपोर्ट्सनुसार, ओला इलेक्ट्रिक कार मार्केटमधील सर्व कारपेक्षा वेगळ्या डिझाइनची असणार आहे, ज्यामध्ये हॅचबॅक कार 70 ते 80 kWh क्षमतेसह लिथियम-आयन बॅटरी पॅक वापरू शकते. त्याच्या सेडान आणि एसयूव्ही मॉडेल्समध्ये उच्च क्षमतेचा बॅटरी पॅक स्थापित असू शकतो.

ड्रायव्हिंग रेंजच्या संदर्भात आलेल्या रिपोर्ट्सनुसार, जर या कारला 80 kWh क्षमतेची लिथियम-आयन बॅटरी पॅक दिली गेली, तर त्याची ड्रायव्हिंग रेंज प्रति चार्ज 500 किमी पर्यंत मिळण्याची शक्यता आहे.

किती असेल किंमत…

ओला इलेक्ट्रिक कारच्या किंमतीबाबत कंपनीने अद्याप कोणतीही घोषणा केलेली नाही, परंतु असे मानले जात आहे की कंपनी ही इलेक्ट्रिक कार 15 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीसह बाजारात आणू शकते.

ओला सेडानला बाह्य डिझाइनमध्ये भरपूर वायुगतिकीय स्वातंत्र्य मिळते जी सामान्य IC इंजिन कारपेक्षा वेगळी आहे. याला वेज-आकाराचा फ्रंट फॅसिआ, एलईडी लाइटिंग सिग्नेचर आणि स्वूपिंग रूफलाइन मिळते.

ओला इलेक्ट्रिकचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी सांगितले की, या कार बाबतचे अधिक तपशील 15 ऑगस्टला येतील. असे कळते की ओलाने महिंद्राचे माजी डिझायनर रामकृपा अनंतन यांना नियुक्त केले आहे, ज्यांनी सध्याची XUV700, थार आणि XUV300 ची रचना केली आहे. ओला इलेक्ट्रिक सुमारे 2 वर्षात प्रवासी कार विभागात प्रवेश करू शकते. ते म्हणाले, उत्पादन प्रक्रिया सामान्यतः OEM पेक्षा स्टार्टअप सेटिंग्जमध्ये जलद असते.

उत्कृष्ट आहे कारचा लूक

टीझर व्हिडिओनुसार कारमध्ये फ्युचरिस्टिक डिझाइन देण्यात आले आहे. त्याच्या पुढच्या भागापासून मागच्या बाजूला एलईडी लाइट्स बसवण्यात आले आहेत, जे अंधारात कारला अतिशय लक्षणीय लूक देतात. टीझरमध्ये कारला लाल रंगात सादर करण्यात आले आहे. स्लीक एलईडी हेडलॅम्प, स्लोपी विंडशील्ड आणि स्पोर्टी अलॉय व्हील ओला इलेक्ट्रिक कारमध्ये दिसतील.

Similar Posts