Satbara Utara : तुमच्या शेतजमिनीच्या सातबाऱ्यावर काही चूक झाली असेल तर आता सोप्या पद्धतीने अशी करा दुरुस्त..
Land Satbara Utara: सातबारा उतारा हा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा असा कागदपत्र असून याला जमिनीचा आरसा असे म्हटले तरी सुद्धा काहीच वावगे ठरणार नाही. मात्र बऱ्याचदा सातबारा उताऱ्यावरील नावामध्ये अथवा इतर काही महत्त्वाच्या गोष्टीमध्ये चूक झालेली असते. या चुका प्रामुख्याने जेव्हा सातबारा हाताने लिहिले जायचा तेव्हाच झालेल्या असून यात नावामध्ये चूक अथवा शेतकऱ्याकडे जितके क्षेत्र असते त्यापेक्षा कमी किंवा अधिक नोंदवले असणे या प्रकारच्या चुका असतात.
अशा चुकांचा शेतकऱ्यांना बऱ्याचदा मोठा त्रास सहन करावा लागतो. शिवाय या चुका दुरुस्त करण्यासाठी वारंवार तलाठी कार्यालयाच्या चकरा माराव्या लागतात. मात्र आता या सर्व झंझटि संपणार असून आता सातबारा उताऱ्यावरील चुकांची दुरुस्ती करण्यासाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे व ही सुविधा मंगळवार म्हणजेच 1 ऑगस्टपासून सर्व राज्यांमध्ये सुरू करण्यात आली आहे.
या सुविधेची पार्श्वभूमी पाहिली असता जमाबंदी आयुक्तालयाने राज्याचा महसूल विभागात संगणीकृत किंवा हस्तलिखित सातबारा उताऱ्यांत दुरुस्तीचा प्रस्ताव दिला होता आता या प्रस्तावाला राज्य सरकारतर्फे मान्यता मिळालेली आहे. संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा विचार केला असता राज्यात तब्बल दोन कोटी 62 लाख सातबारा उतारे असून या उताऱ्यांत हाताने सातबारा लिहित असताना झालेल्या चुका आता दुरुस्त करता येणार असून सातबारा उताऱ्यातील चुका दुरुस्ती करण्याचे अधिकार हे तहसीलदारांना देण्यात आले आहेत.
सातबाऱ्या वरील चुका अशा पद्धतीने होणार दुरुस्त
सातबारा उताऱ्यार काही चुका झालेल्या आहेत त्या दुरुस्त करण्याकरिता अनेक अर्ज दाखल झालेले असून ते तहसीलदारांच्या पातळीवर प्रलंबित आहेत. कारण तर आतापर्यंत ही प्रक्रिया लिखित स्वरूपात असल्याने मोठ्या प्रमाणावर अर्ज प्रलंबित असतात. आता ऑनलाईन पद्धतीने सातबारा दुरुस्तीचे किती अर्ज प्रलंबित आहेत याचे रेकॉर्ड ठेवणे शक्य होणार आहे.
यासाठी नागरिकांना आता ई हक्क पोर्टलवर जाऊन त्या ठिकाणी सातबारा फेरफार या ठिकाणी अर्ज करावा लागणार आहे. त्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे अपलोड करून हे अर्ज संबंधितांकडे गेल्यावर तलाठी संबंधित कागदपत्रांची पुरावे तपासतील आणि आवश्यक त्या गोष्टींची पूर्तता करून ती दुरुस्ती तहसीलदारांकडे मान्यतेकरिता पाठवली जाणार आहे.
दुरुस्तीसाठी आलेल्या पाच लाख अर्जा पैकी एक लाख पेक्षा जास्त अर्ज ऑनलाईन पद्धतीने आले असून त्यातील 59,230 अर्ज स्वीकारण्यात आले अजून देखील 39 हजार पेक्षा जास्त अर्ज त्रुटींची पूर्तता करण्यासाठी प्रलंबित असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जितके जिल्हे आहेत तेवढ्या जिल्ह्यांमध्ये सातबारा दुरुस्तीच्या अर्जांचा आढावा घेण्याची सूचना सुद्धा सर्व जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आले असून जे अर्ज ऑफलाइन पद्धतीने दाखल झालेले आहेत अशा अर्जांची ऑनलाईन इंट्री करण्याच्या सूचना सुद्धा देण्यात आले आहेत.
ऑनलाइन दुरुस्तीचे हे फायदे मिळतील Land Satbara Utara
आता या ऑनलाइन पद्धतीनेे सातबारा दुरुस्तीसाठी जो अर्ज आहे तो नेमका कोणत्या ठिकाणी प्रलंबित आहे याची नेमकी माहिती घेणे शक्य होणार तर आहेच शिवाय, संबंधित अर्ज का प्रलंबित आहेत याचे कारण देखील कळणार असल्यामुळे अर्ज ताबडतोब निकाली काढण्यातील वेळखाऊपणा आता टाळता येणार आहे.
आणि ऑनलाइन दुरुस्तीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे यामुळे अर्ज गहाळ होण्याची शक्यता राहणारच नाही. आणि अर्जांवर सुनावणी देखील लवकर घेणे शक्य होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आता ई हक्क पोर्टलवर जाऊन त्या ठिकाणी सातबारा, फेरफार दुरुस्तीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.