तुम्ही मानसिक आजारी तर नाही ना? अनेकांमध्ये जाणवू लागली ही 5 लक्षणं..

मानसिक आरोग्याविषयी लोकांचे विचार आता बदलत चालले आहेत, आजच्या काळामध्ये मानसिक आरोग्याकडे हळूहळू लक्ष दिले जात आहे. आज बरेच लोक या समस्येबद्दल उघडपणाने बोलू लागले आहेत आणि त्यांच्या मानसिक आरोग्याच्या समस्यांबद्दल इतरांसोबत शेअर करू लागले आहेत. यामुळे मानसिक आरोग्याविषयी अधिकाधिक लोकांमध्ये जागरुकता निर्माण होत चालली आहे. तथापि, हे देखील तितकेच खरे आहे की आपण अद्यापपर्यंत मानसिक आजाराची लक्षणे ओळखू शकलेलो नाहीये. मानसिक आजाराची लक्षणे ओळखणे आणि वेळीच तज्ज्ञांची मदत घेणे अत्यंत आवश्यक आहे.

(Mental Health tips) जर तुम्हालाही वाटत असेल की एखादी गोष्ट तुम्हाला त्रास देत आहे, परंतु तुम्ही गोंधळात पडले असाल की, ते मानसिक आजाराचे लक्षण आहे की नाही. आज या लेखद्वारे आम्ही तुम्हाला ते ओळखण्यात मदत करणार आहोत. वास्तविक, कोणत्याही मानसिक आरोग्य समस्या शोधण्यासाठी एखाद्या व्यक्तीला आपल्या आयुष्यामध्ये काही महत्त्वाचे बदल जाणून घ्यावे लागतात.

दीर्घकाळापर्यंत उदास राहणे

काही वाईट बातमी समजल्यावर किंवा एखाद्या घटनेबद्दल वाईट वाटणे हे tr कॉमन आहे. काही काळ तुम्हाला वाईट वाटू शकतं, परंतु ते तात्पुरते असू शकते. मात्र, जर तुम्हाला बऱ्याच काळापासून उदासीनता जाणवत असेल आणि तुम्हाला त्यामागचे कारण माहीत नसेल तर ते मानसिक आजाराचे लक्षण असू शकते.

काळजी (एंग्जाइटी)

अचानक स्तब्ध राहणं, श्वासोच्छवासाचा वेग वाढणे आणि हृदयाचे धडधड वाढणे ही चिंतेची लक्षणे असू शकतात. तुम्हाला जर वारंवार चिंता भेडसावत असेल तर ही एक गंभीर बाब आहे. या प्रकरणामध्ये आपण एखाद्याशी बोललो पाहिजे अथवा वैद्यकीय मदत घ्यावी.

खूप झोपणे –

जेव्हा आपले मन थकते तेव्हा आपले शरीर सुद्धा त्याच प्रकारे प्रतिक्रिया देत असते. आपण दिवसभरातील जास्त वेळ झोपेमध्ये घालवत असाल तर तुम्हाला नैराश्य किंवा इतर मानसिक विकारांचा त्रास होण्याची दाट शक्यता असते.

रागावर नियंत्रण न ठेवता येणे?

जर का तुम्हाला वाटत असेल की तुम्ही तुमच्या रागावर नियंत्रण ठेवूच शकत नाही आणि तुमचा संयम लगेचच सुटत असेल तर ते मानसिक (mental disorders) आजाराचे लक्षण असू शकते. हे तणाव, चिंता किंवा दु:ख यांची चेतावणीचे चिन्ह आहे, एखादी गोष्ट आपण खूप काळापासून आणि प्रत्येकापासून लपवून ठेवलेली किंवा कोणत्या तरी गोष्टीची तुम्ही सतत चिंता करत असू शकता.

मतिभ्रम

जेव्हा तुम्ही खूप थकलेले असतात तेव्हा असे होते. तुम्ही काही गोष्टींबद्दल भ्रमित (hallucinate) होऊ शकता आणि हे स्किझोफ्रेनियासारख्या मानसिक विकाराचे लक्षण असते. मात्र, वेळेवर ओळखता आल्यास त्याचा प्रभाव नक्कीच कमी केला जाऊ शकतो आणि आपण सामान्य जीवन जगू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!