अंत्यविधीसाठी उंडणगावला जाणाऱ्या कारचा अपघात; एक ठार तर १५ जखमी..

अंत्यविधीसाठी जाणाऱ्या ओमणी कार ओव्हरटेकच्या करण्याच्या प्रयत्नात भरधाव वेगात असलेल्या टेम्पो आणि कारची समोरासमोर धडक होऊन एकजण जागीच ठार तर १५ जण गंभीर जखमी झाल्याची घटना जळगाव-औरंगाबाद रोडवरील डोंगरगाव फाट्याजवळ बुधवारी घडली असून सुमनबाई उत्तम वानखेडे ( ७०, रा.कन्नड ) असे मयत स्त्रीचे नाव आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, उंडणगाव येथील सुपडू किसन किरकाळे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले असता त्यांच्या अंत्यविधीसाठी कन्नड येथून काही नातेवाईक कार क्रमांक MH 20 EE 5084 ने उंडणगाव येथे जात होते. तर टेम्पो क्रमांक MH 04 EB 0034 भरधाव वेगाने सिल्लोडला येत होता. डोंगरगाव फाट्याजवळ ओव्हरटेक करताना दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक होऊन सुमनबाई उत्तम वानखेडे ( ७०, रा.कन्नड ) यांचा जागीच मृत्यू झाला.

मयत सुमनबाई उत्तम वानखेडे

जखमी प्रवास्यांची नावे पुढीलप्रमाणे:

जयाबाई किसन वानखेडे, यश विठलं वानखेडे, सुनीता शामराव आळने, लक्ष्मीबाई म्हातारजी मोरे, विठलं भिका वानखेडे, ठगणाबाई महादू केसापुरे, छाया विठलं वानखेडे, रेखा योगेश बनसोडे, योगेश भीमराव बनसोडे, गयाबाई गणेश मोरे, निर्मला बाई कैलास वानखेडे, गणेश सखाराम मोरे, हिराबाई बाबुराव केसापुरे, रंगुबाई लक्ष्मण मोरे, कैलास शामराव मोरे सर्व जण रा. कन्नड यांच्यावर सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले.

यापैकी हिराबाई केसापुरे रा. सिल्लोड, विठलं वानखेडे , कैलास रामराव मोरे, योगेश भीमराव बनसोडे ( रा.कन्नड ) चार गंभीर जखमींवर औरंगाबाद येथे उपचार करण्यात सुरू आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!