औरंगाबाद स्मार्ट सिटीतील पाणीपुरवठ्याचं वेळापत्रक आता मोबाइलवर, कोणत्या भागात चालणार हे अ‍ॅप ?

औरंगाबाद शहरामधील नागरिकांना पाण्याच्या वेळापत्रकाची माहिती मिळण्यासाठी औरंगाबाद स्मार्ट सिटी तर्फे ‘जल–बेल’ Jal Bell App हे ॲप्लिकशन लॉन्च करण्यात आले आहे.

‘जल–बेल’ ॲप्लिकशनमुळे औरंगाबाद शहरातील नागरिकांना पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकाची सर्व माहिती मोबाइल वर मिळणार आहे. यामुळे शहरातील नागरिकांना त्यांच्या भागामध्ये येणाऱ्या नळाच्या पाण्याचे वेळापत्रक आधीच उपलब्ध होईल.

उन्हाळ्यामध्ये पाण्याच्या अतिरिक्त मागणीला लक्षात घेता महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक आणि स्मार्ट सिटीचे CEO आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या मार्गदर्शनाखाली औरंगाबाद मनपाची संपूर्ण यंत्रणा वेगानं पाऊलं उचलत असून विविध उपाय-योजना करून शहरामधील पाण्याची आवक १० ते १५ MLD पर्यंत वाढवली जात आहे. शिवाय पाण्याची होणारी चोरी, पाण्याचा होणार अपव्यय थांबून जास्तीत-जास्त पाण्याची बचत करण्यात येत आहे, जेणेकरून शहरामधील सर्व भागांना व्यवस्थित पाणीपुरवठा करता येईल. मात्र पहिल्या टप्प्यामध्ये सिडको N-5 मधील जलकुंभाच्या अंतर्गत येणाऱ्या भागांनाच या जल-बेल ॲप्लिकशनची सुविधा मिळणार आहे.

‘जल बेल’ ॲप्लिकशनचे फायदे

‘जल बेल’ ॲप्लिकशन द्वारे नागरिकांना त्यांच्या भागामध्ये येणाऱ्या पाण्याची तारीख, वेळ आणि पाण्याचा कालावधी किती असेल या माहितीचा एक नोटिफिकेशन मोबाइल वर येईल. यामुळे नागरिकांना त्यांच्या भागात केव्हा पाणी येणार याची माहिती मिळेल. पाणी येण्याच्या थोड्या वेळापूर्वी सुद्धा नागरिकांना त्यांच्या मोबाइलवर अलर्ट मिळेल. त्यासोबतच महिन्याभरामध्ये केव्हा पाणी आले, याची माहिती देखील या जल- बेल ॲप्लिकशनवर असेल. या वेळापत्रकामध्ये पाण्याची तारीख, वार, वेळ आणि कालावधी या सर्वांची नोंद असेल. त्यामुळे नागरिकांना पाण्याचे नियोजन करणे शक्य होणार आहे.

पाणी येण्यासाठी १ मिनिट जरी उशीर होणार असला तरी देखील हे ॲप्लिकशन नागरिकांना नोटिफिकेशन देईल. या ॲप्लिकशनच्या माध्यमातून नागरिकांना पाण्याविषयीच्या तक्रारी सुद्धा नोंदवता येईल. या ॲप्लिकशनचा डेमो म्हाडा कॉलनीमध्ये घेण्यात आला आणि हा डेमो यशस्वी देखील ठरल्याचा दावा मनपा आयुक्तांनी केला आहे.

लवकरच हे ॲप्लिकेशन संपूर्ण शहरात काम करेल

सध्या हे ॲप्लिकेशन फक्त सिडको-हडकोला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या एन-5 च्या पाण्याच्या टाकीसाठी काम करणार असल्याची माहिती आयुक्त पांडे यांनी दिली. काही दिवसांनी हे ॲप्लिकेशन संपूर्ण शहरासाठी काम करेल. हे ॲप्लिकेशन लाइनमन, वॉल ऑपरेटींग कर्मचारी, अभियंते आणि महापालिका पेयजल पुरवठा अधिकारी यांच्यात समन्वय राखून चालवले जाणार आहे. विशेषत: या ॲप्लिकेशन प्रशासनाला पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यावर लक्ष केंद्रित करणे सोपे होणार आहे.

कोणत्या भागात मिळणार अ‍ॅपची सुविधा?

चिकलठाणा – वॉर्ड क्र.88,89
चौधरी कॉलनी – वॉर्ड:37
म्हाडा कॉलनी – वॉर्ड क्र.87,88
म्हसनतपुर – वॉर्ड:38
संजयनगर – वॉर्ड:85
नारेगाव – वॉर्ड:36
मथुरानगर – वॉर्ड: 40,64
एन 1 ए/बी सेक्टर – वॉर्ड : 38
एन-6 साईनगर/शुभश्री कॉलनी – वॉर्ड : 63
एन 1 टाऊन सेंटर सिडको बस स्टँड – वॉर्ड :65
एन 6 शिवजोति कॉलनी F – वॉर्ड : 62
आविष्कार कॉलनी – वॉर्ड : 63
उत्तरनगरी – वॉर्ड:36
एन 8 गणेशनगर – वॉर्ड:40
एन 6 सिडको – वॉर्ड:64
एन 5 साऊथ | एन7 के सेक्टर – वॉर्ड:64,40
गुलमोहर कॉलनी – वॉर्ड:64
ब्रिजवाडी – वॉर्ड:36
संघर्षनगर | विट्टलनगर -वॉर्ड: 85,87
एन-3 सिडको – वॉर्ड:80
एन-2सिडको – वॉर्ड:81
ठाकरे नगर – वॉर्ड:81
एन-4 सिडको – वॉर्ड: 80
जयभवानीनगर – वॉर्ड:91
संतोषीमाता नगर – वॉर्ड:82
रामनगर – वॉर्ड:85,86
राजीव गांधी नगर – वॉर्ड:81,82
मुकुंदवाडी – वॉर्ड:82,83,84

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!