‘ट्रॅक्टर आमचा डिझेल तुमचे’ योजना जाणून घ्या फायदे

‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’नंतर ठाकरे सरकारची शेतकऱ्यांसाठी ‘ट्रॅक्टर आमचा डिझेल तुमचे’ योजना..

मागच्या दोन महिन्यात डिझेलच्या दरामध्ये तब्बल 10 रुपयांची वाढ झाली. यामुळे राज्यात सरा-सरी डिझेलचे दर 105 रुपयांच्या आसपास पोहोचले आहे.

डिझेलच्या दर वाढीचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसला असून ट्रॅक्टरने शेतीच्या मशागतीच्या कामांचे दर शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे, यावर उपाययोजना म्हणून ठाकरे सरकारने नवी योजना राबवली आहे. ‘ट्रॅक्टर आमचे डिझेल तुमचे’ या योजनेचा फायदा नक्कीच शेतकऱ्यांना होणार आहे.

विधवा शेतकरी महिला, आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिला शेतकऱ्यांना शेतीच्या मशागतीसाठी सहाय्य व्हावे, व त्यांचा शेतीचा खर्च कमी व्हावा यासाठी ‘ट्रॅक्टर आमचे, डिजेल तुमचे’, हा उपक्रम राबविण्यात येत आहे. देशात सर्वप्रथम ही योजना अकोला जिल्ह्यामध्ये राबविण्यात येत असून ही योजना राज्याला व देशाला मार्गदर्शक ठरणार आहे. याबाबत कामगार राज्यमंत्री नेते बच्चू कडू यांनी माहिती दिली आहे.

अकोला जिल्ह्यामधील निराधार, विधवा आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी महिलांना ‘पेरणी ते कापणी’ च्या दरम्यान मदत मिळून उत्पादन खर्च कमी व्हावा याकरिता ‘ट्रॅक्टर आमचे, डिझेल तुमचे’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचा सोमवारी (दि.16) वरुळ-जऊळका ता. अकोट जिल्हा अकोला येथील सिमा काठोळे यांच्या शेतात शुभारंभ केला.

बच्चू कडू म्हणाले की, शेतकरी कुटुंबामध्ये पतीच्या मृत्युनंतर कुटुंबाची सर्व जबाबदारी महिलांवर येते. पण नांगरणी, वखरणी आणि पावसाळा सुरू झाल्यावर पेरणीसाठी पैसा आणायचा तरी कुठून? असे अनेक प्रश्न महीलांसमोर उभे असतात. त्यात त्यांना मदत व्हावी याकरीता, हा उपक्रम प्रायोगिक तत्वावर सुरु केला आहे.

या योजने मुळे अकोला जिल्ह्यामधील सर्व निराधार, विधवा आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांतील महिलांचे आर्थिक स्वालंबन होण्यास मदत होईल. सदरील उपक्रम यशस्वी झाल्यास राज्यभर राबविण्यासाठी आपण प्रयत्न करु असे, कडू यांनी सांगितले.

त्या अनुषंगाने विधवा शेतकरी महिलाकरीता ‘पेरणी ते कापणी’ दरम्यान शेतकऱ्यांना कराव्या लागणाऱ्या खर्चाकरिता शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून मदत करण्याचे आवाहन कडू यांनी संबंधित यंत्रणेला दिले. तत्पूर्वी कार्यक्रमाच्या शुभारंभाप्रसंगी मंत्री बच्चू कडू यांनी स्वतः शेतात ट्रॅक्टर चालवत नांगरणी केली. पाहा व्हिडिओ..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!