Pradhan Mantri Martu Vandana Yojana in Marathi | महिलांना मिळणार 6 हजार रुपये, योजनेचा लाभ घेण्यासाठी असा करा अर्ज..

Pradhan Mantri Martu Vandana Yojana

Pradhan Mantri Martu Vandana Yojana in Marathi: सरकारकडून सर्वांसाठी अनेक योजना राबविण्यात येतात. विद्यार्थी असो, शेतकरी असो किंवा महिला असो प्रत्येक घटकासाठी राज्य सरकार व केंद्र सरकार विविध योजना राबविते. यामध्ये केंद्र सरकारची एक खास योजना आहे. या योजनेविषयी जाणून घेऊ या..

या योजनेचं नाव ‘प्रधानमंत्री मातृ वंदना योजना’ (PM Martu Vandana Yojana) असं आहे. तुमच्या घरात जर लहान मूल येणार असेल, तर सरकार पैसे देणार आहे. ही केंद्र सरकारची योजना असून याद्वारे बाळाच्या जन्मावर पैसे पुरवले जातात. ही योजना महिलांसाठी आहे.

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेबाबत..Pradhan Mantri Martu Vandana Yojana


प्रधानमंत्री मातृ योजना राज्यात 8 डिसेंबर 2017 पासून सुरू झाली आहे. ही योजना केंद्र व राज्य सरकार यांच्या साहाय्याने आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येते. या योजनेत केंद्र सरकारचा 40 टक्के तर राज्य सरकारचा 60 टक्के सहभाग आहे. (pm martu vandana yojana in marathi)

pradhan mantri martu vandana yojana प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेअंतर्गत महिलांना आर्थिक साहाय्य दिले जाते. केंद्र सरकारमार्फत पहिल्या अपत्यासाठी गर्भवती महिला व स्तनदा मातांसाठी ही योजना राबविली जाते. (Pradhan Mantri Martu Vandana scheme Maharashtra)

आरोग्य सुधारण्याच्या दृष्टिने गर्भवती महिला व स्तनदा मातेला सकस आहार घेण्यास प्रोत्साहित करुन त्यांच्या आरोग्यात सुधारणा व्हावी व जन्माला येणाऱ्या नवजात बालकांचेही आरोग्य सुधारावे हा या योजनेचा उद्देश आहे. (Pradhan Mantri Martu Vandana scheme Information in Marathi)

योजनेचा लाभ
प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेअंतर्गत गरोदर महिलांना 6 हजार रुपये मिळतात. मोदी सरकार हे पैसे चार टप्प्यांत देते. पहिल्या टप्प्यात 1000 रुपये, दुसऱ्या टप्प्यात 2000 रुपये, तिसऱ्या टप्प्यात 2000 रुपये आणि शेवटच्या टप्प्यात 1000 रुपये दिल्या जातात. यामधील शेवटचा हप्ता बाळाच्या जन्मावेळी बाळाच्या जन्मावेळी हॉस्पिटलमध्ये दिला जातो.

योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे


आई-वडिलांचे आधार कार्ड
आई-वडिलांचे ओळखपत्र
बाळाचा जन्माचा दाखला
बॅंक पासबुक

योजनेचा लाभ घेण्यासाठी असा करा अर्ज..Pradhan Mantri Martu Vandana Yojana


pm martu vandana yojana online apply या योजनेत अर्ज करण्यासाठी महिला आणि बाल विकास विभागाच्या अधिकृत संकेतस्थळ 👉 https://wcd.nic.in वर जाऊन अर्ज करा. तसेच अंगणवाडी केंद्र किंवा आरोग्य केंद्राद्वारे अर्ज करू शकता.


हे देखील वाचा-


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!