औरंगाबादेत 13 दिवस जमावबंदी लागू; राज ठाकरेंच्या सभेवर प्रशचिन्ह.

येणाऱ्या १ मे २०२२ रोजी औरंगाबाद मध्ये महाराष्ट्र दिनानिमित्त मनसे प्रमुख राज ठाकरे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे.

दरम्यान औरंगाबाद पोलिसांनी दिलेल्या नवीन आदेशा नंतर मात्र सभा होणार की नाही, यावर प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे. पोलिसांनी राज ठाकरे यांच्या सभेला अद्याप परवानगी दिलेली नाही. आता त्यातच येणाऱ्या ९ मे पर्यंत औरंगाबादमध्ये जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहे.

नवीन आदेशानुसार औरंगाबाद पोलीस हद्दीत पाच किंवा पाच पेक्षा अधिक व्यक्तींना सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमण्यास निदर्शने, मोर्चा, धरणे, मिरवणूक काढण्यास मनाई करण्यात आली आहे.

अशा परीस्थितीत मनसेतर्फे राज ठाकरे यांच्या सभेला किमान एक लाख लोक जमतील, असा दावा करण्यात येत असून या पार्श्वभूमीवर पोलिसांनी काढलेल्या जमावबंदीच्या आदेशामुळे मोठा तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज ठाकरे यांची सभा वेळेत आणि ठरलेल्या ठिकाणी होईल की नाही, याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.

औरंगाबादेत ९ मेपर्यंत जमावबंदी लागू

औरंगाबादमध्ये राज ठाकरे यांच्या विराट सभेची जोरदार तयारी सुरु असतानाच मनसेला मोठा झटका बसलाय. पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी औरंगाबाद शहराच्या हद्दीत शस्त्रबंदी आणि जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. कायदा व सुव्यवस्था बिघडू नयेत, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे मनसे समोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

Similar Posts