“मी धर्मांध नाही तर धर्माभिमानी.”; राज ठाकरेंच्या औरंगाबादमधील सभेचा दुसरा टीझर जाहीर; जनतेची उत्सुकता शिगेला…

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी १ मे २०२२ रोजी औरंगाबादमध्ये सभा घेण्याची घोषणा केल्यावर मनसे कार्यकर्त्यांकडून सभेसाठी जोरदार तयारी सुरु आहे. एकीकडे प्रशासन परवानगी देणार की नाही याबाबत अद्याप स्पष्ट नसताना मनसे मात्र सभा घेण्यावर ठाम आहे.

त्यातच आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्वीटरला राज ठाकरेंच्या सभेचा टीझर प्रसिद्ध केला आहे. या टीझरमध्ये औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर केला असून त्यामध्ये चलो संभाजीनगर अशी घोषणा केली आहे.

तसेच या टीझरमध्ये राज ठाकरे यांच्या सभेमधील काही वक्तव्यांचा वापर करण्यात आला आहे. ज्यामध्ये राज ठाकरे आपण “धर्मांध नसून धर्माभिमानी” असल्याचं सांगत आहेत.

दरम्यान मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केलेल्या आणखी एका ट्वीटमध्ये थेट मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत “अजानची स्पर्धा भरवणारे, हनुमान चालिसाला विरोध करणारे नव पुरोगामीच आणि नव पुरोगाम्यांना आपण हिंदू आहोत याची जाणीव करून देणारे राजसाहेबच. आता कितीही हिंदू हिंदू म्हणून ओरडलात तरी “बुंदसे गयी वो हौद से नहीं आती”,” असा टोला लगावला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!