आता शेत जमीनीची मोजणी होणार फक्त ’30 मिनिटांत’; कशी ते जाणून घ्या…

शेतकऱ्यांनी जमिनीची मोजणी करण्यासाठी अर्ज केल्यावर सदरील प्रकरणे भूमिअभिलेख कार्यालयाकडे काही महिने प्रलंबित राहतात. पण आता मात्र महाराष्ट्राचा भूमि अभिलेख विभागा द्वारे ‘रोव्हर मशीन’चा वापर करून जमिनींची मोजणी फक्त काही मिनिटांत होणार आहे.

राज्य सरकारने भूमी अभिलेख विभागाला या खरेदीसाठी तब्बल 80 कोटींचा निधी उपलब्ध करून दिला असून एक हजार रोव्हर मशीन्स खरेदीसाठी निविदा अंतिम टप्प्यात असून मे महिन्याखेरीस त्या पूर्ण होतील अशी माहिती भूमी अभिलेख विभागाच्या एका अधिकाऱ्याने दिली आहे.

रोव्हर मशीनद्वारे 1 हेक्टर क्षेत्राची मोजणी केवळ 30 मिनिटांतच करता येणार आहे, असा भूमी अभिलेख विभागाचा दावा आहे. पण हे रोव्हर मशीन काय आहे? ते कसं काम करतं? ते सध्या अस्तित्वात असलेल्या जमीन मोजणीच्या प्लेन टेबल आणि ईटीएस मशीन पद्धतीपेक्षा वेगळं कसं आहे? तेच आता आपण जाणून घेणार आहोत.

जर जमिनीची मोजणी करायची असेल तर त्याकरीता रोव्हर मशिन हे GPS बेस टेक्नॉलॉजीच्या साहाय्याने कार्य करेल. त्यामुळे जमिनीची मोजणी आता काही क्षणातच पूर्ण होणार आहे. राज्यातील भूमी अभिलेख विभागाला रोव्हर मशिन्स उपलब्ध झाल्यास राज्यातील सर्व प्रकरणांचा त्वरीत निपटारा करण्यास मदत होणार आहे. या यंत्रांमुळे प्रत्येक जिल्ह्यात महिन्याला सरासरी 2000 ते 2200 जमीन मोजणीची प्रकरणे निकाली काढता येईल.

जमिनीची अचूक आणि कमीत कमी वेळेत मोजणी करण्यासाठी भूमी अभिलेख विभागाने सव्‍‌र्हे ऑफ इंडियाच्या सहाय्याने ७७ कन्टिन्यूस ऑपरेशन रेफरन्स स्टेशन – कॉर्स उभारले आहेत. या कॉर्सच्या आधारे GPS मोजणी काही वेळात करता येणार आहे. या कॉर्समधून होणारी मोजणी रोव्हरमध्ये (यंत्र) संकलित होणार असून पडद्यावर (टॅब) हे आकडे दिसणार आहेत.

सध्या जमीन मोजण्यासाठी भूमी अभिलेख विभागाकडून ईटीएस यंत्राच्या सहाय्याने मोजणी करण्यात येते. जागेवर GPS रीडिंग घेऊन त्या क्षेत्राचे अक्षांश व रेखांश घेतले जातात. या अक्षांश व रेखांशच्या आधारे जमीन मोजणी करणे सोयीचे ठरत होते. मात्र, सध्या अस्तित्वात असलेल्या तंत्रज्ञानानुसार अचूक जीपीएस रीडिंग घेण्यासाठी किमान एक तास ते चार तास लागतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!