लिस्ट तयार ठेवा! आजपासून सुरू झालंय Flipkart चा भन्नाट सेल, प्रत्येक खरेदीवर होईल ‘महाबचत’; सुरुवातीची किंमत फक्त २९९ रुपये

१२ एप्रिलपासून सुरू झालेल्या Flipkart च्या Big Saving Days Sale मध्ये तुम्हाला अनेक प्रोडक्ट्सवर आकर्षक ऑफर्सचा फायदा मिळणार असून हा सेल १४ एप्रिलपर्यंत चालणार आहे. तसेच प्रोडक्ट्सवर बँक डिस्काउंटचा देखील फायदा मिळेल. ICICI Bank क्रेडिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड EMI द्वारे खरेदी केल्यावर यूजर्सला १० टक्के डिस्काउंटचा फायदा मिळेल.

Flipkart सेलमध्ये बेस्ट-सेलर स्मार्टफोन, टीव्ही आणि अप्लायंसेस, इलेक्ट्रॉनिक्स, फॅशन, होम आणि किटन प्रोडक्ट्ससह अनेक वस्तूंवर बंपर डिस्काउंट मिळणार आहे शिवाय सेलमध्ये केलेल्या खरेदीवर हजारो रुपयांची बचत होईल.

जाणून घ्या Flipkart Big Saving Days सेलमध्ये मिळणाऱ्या ऑफर्सविषयी सविस्तर.

मोबाइल आणि स्मार्ट टीव्हीवर आकर्षक ऑफर्स

Big Saving Days Sale मध्ये

● Poco M4 Pro मोबाईल १३,९९९ च्या सुरुवाती किंमतीमध्ये खरेदी करू शकता.

● Infinix Note 11s हा मोबाईल १२,४९९ रुपये किंमतीत उपलब्ध आहे.

● Xiaomi चा Redmi Note 10s मोबाईल फक्त ११,९९९ रुपये किंमतीत उपलब्ध आहे.

या सेलमध्ये स्मार्ट टीव्ही आणि ए.सी देखील स्वस्तामध्ये खरेदी करू शकता. Flipkart sale मध्ये २२,९९९ रुपये सुरुवाती किंमतीत अल्ट्रा-हाय रिझॉल्यूशन 4K TV उपलब्ध आहेत.

किचन अप्लायंसेस २९९ रुपये सुरुवाती किंमतीपासून उपलब्ध आहे. सेलमध्ये १९,४९९ रुपये सुरुवाती किंमतीत A.C. आणि ७,४९९ रुपये सुरुवाती किंमतीत टीव्ही उपलब्ध आहे.

इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर ऑफर

Flipkart च्या Big Saving Days Sale मध्ये इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर ८० टक्क्यांपर्यंतच्या डिस्काउंटचा फायदा मिळेल.

लॅपटॉप ४० टक्के डिस्काउंटसह खरेदी करण्याची सुवर्णसंधी आहे. स्मार्ट वॉट आणि इतर स्मार्ट वियरेबल वस्तूंवर ६० टक्के डिस्काउंट मिळेल. True Wireless इयरबड्स ७९९ रुपयेच्या सुरुवाती किंमतीत मिळतील.

कपडे व इतर फॅशनेबल वस्तूंवर देखील देखील आकर्षक ऑफर्स उपलब्ध होतील. ५० ते ८० टक्के डिस्काउंटसह या कॅटेगरीमधील वस्तू खरेदी करता येतील. तसेच, फर्निचर व इतर वस्तूंवर देखील ८० टक्क्यांपर्यंत डिस्काउंटचा फायदा मिळेल. दरम्यान, Flipkart Big Saving Days Sale १२ एप्रिलला सुरू होणार असून, १४ एप्रिलपर्यंत याचा फायदा घेता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!