CIBIL स्कोर खराब आहे का, तर मग Loan कसं मिळेल ? या उपायाच्या मदतीने असे वाढवा CIBIL स्कोर..

तुम्हाला कर्ज घ्यावयाचे असल्यास कोणतीही बँक किंवा वित्तीय संस्था तुमचा CIBIL स्कोअर तपासत असते..जर का तुमचं CIBIL स्कोअरच खराब असेल तर कर्ज मिळण्यात अडचणी येण्याची शक्यता असते. आणि जरी तुम्हाला Loan मंजूर झाले तरी व्याजदर खूपच जास्त लावण्यात येतात. बऱ्याचदा अत्याधिक आर्थिक जबाबदारीपणामुळे, CIBIL स्कोअर खालावत जाऊन Loan घेण्यास अडचण येते. तुम्हाला तुमचा क्रेडिट स्कोअर सुधारावयाचा असेल तर तुम्ही या 7 प्रकारे फक्त 12 ते 14 महिन्यांत सुधारू शकता.

तज्ञांच्या मते, क्रेडिट स्कोअर हा 300 ते 900 पर्यंत असतो म्हणजे, सर्वात कमी 300 आणि सर्वोत्तम 900 असतो. सरासरी क्रेडिट स्कोअरबद्दल बोलत असले तरी 720 ते 800 च्या दरम्यान असावे..

EMI वेळेवर भरा.
कर्जाचा EMI वेळेवर न भरल्यास बँका आणि वित्तीय संस्था दंड आकारतात, ज्यामुळे आपला CIBIL स्कोर कमी होतो. तुम्ही तुम्ही घेतलेल्या EMI ची तारीख लक्षात ठेवण्यासाठी मोबाईलवर रिमाइंडर सेट करू शकता.

तुमच्या क्रेडिट रिपोर्ट मध्ये असलेल्या चुका तपासा.
तुमच्या माहितीबाहेर काही चूक झाली असेल, तर ती लवकरात लवकर दुरूस्ती करा, कारण या चुका तुमचा क्रेडिट स्कोअर कमी करतात..

एका प्रकारच्या कर्जाऐवजी क्रेडिट कार्ड, वाहन कर्ज, गृह कर्ज यांचे मिश्रण करा. असुरक्षित कर्जे आधी हाताळा. जर मोठ्या प्रमाणात सुरक्षित कर्जे असतील तर, बँक किंवा वित्त संस्थेकडे तुमची चांगली इमेज राहील.

क्रेडिट कार्ड आणि इतर कर्जाची अंतिम मुदतीपूर्वी परतफेड करा. एकाच वेळी अनेक कर्ज घेणे टाळा. हे तुम्हाला CIBIL स्कोर राखण्यात खूप मदत करेल.

संयुक्त खातेदार किंवा कर्जासाठी हमीदार बनणे टाळा, कारण दुसऱ्या पक्षाची कर्ज परतफेडीची पद्धत किंवा डिफॉल्ट तुमच्या CIBIL स्कोअरवर थेट परिणाम करू शकतात.

तुमच्या क्रेडिट कार्डचा अतिवापर करू नका. क्रेडिट कार्डमधून पैसे काढू नका. प्रत्येक महिन्यासाठी निश्चित केलेल्या 30% क्रेडिट मर्यादेपेक्षा जास्त खर्च करणे टाळा..

जर तुम्ही कमी कालावधीत कर्जाची परतफेड करू शकत नसाल, तर बँक किंवा संस्था तुम्हाला डिफॉल्ट घोषित करू शकतात आणि तुमचा CIBIL स्कोअर देखील खराब होऊ शकतो. त्यामुळे पैसे परत करण्यासाठी दीर्घ कालावधी निवडा. यामध्ये व्याजदरही कमी राहतो..

सिबिल स्कोअर म्हणजे नेमकं काय ?
CIBIL चे पूर्ण रूप क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो (इंडिया) लिमिटेड आहे. CIBIL स्कोअर 300 ते 900 पर्यंत आहे. जर एखाद्याचा CIBIL स्कोर 600 च्या खाली आला तर त्याचा स्कोअर खराब मानला जातो. स्कोअर 600 ते 649 च्या दरम्यान आला तर तो देखील वाईट श्रेणीत गणला जाईल. जर हा स्कोअर 650 ते 699 च्या रेंजमध्ये असेल तर स्कोअर योग्य मानला जाईल. 700 आणि 749 मधील CIBIL स्कोअर चांगला मानला जातो, तर 750 वरील स्कोअर उत्कृष्ट मानला जातो..

CIBIL स्कोअर कसा तपासायचा ?

▪ सीबील स्कोअर मोफत पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा : https://cutt.ly/Ewu5KBdI

▪ यानंतर पुढे विचारण्यात आलेली संपूर्ण माहिती भरा.

▪ तुम्हाला तुमचा सिबिल स्कोर ताबडतोब समोर दिसेल.

संबंधित साईट पूर्णपणे सुरक्षित असून तुम्ही आपला सिबिल स्कोर चेक करण्यासोबत लोनसाठी अर्ज देखील करू शकता.

तुमचा सध्याचा सिबिल स्कोर कसा आहे? हे पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

https://cutt.ly/Ewu5KBdI

📥 या वेसाईटवर तुम्ही तुमचा सिबील स्कोर Pdf मध्ये सुद्धा डाऊनलोड करू शकतात…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!