Mazhi Kanya Bhagyashree Yojana | एक मुलगी असेल तर मिळणार 50 हजार रुपये, त्यासाठी करा हे काम

Mazhi Kanya Bhagyashree Yojana
Mazhi Kanya Bhagyashree Yojana

Mazhi Kanya Bhagyashree Yojana: मुलींच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी केंद्र व राज्य सरकार नेहमीच काहींना काही योजना राबवत असतात. मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी राज्य सरकारने 1 एप्रिल 2016 रोजी एक योजना सुरु केली. या योजनेचं नाव ‘माझी कन्या भाग्यश्री योजना’ असं आहे.

ही योजना मुलींसाठी वरदान ठरलेली आहे. या योजनेमुळे मुलींना आर्थिक लाभ होणार आहे. राज्य सरकारकडून या योजनेअंतर्गत मुलींना 50,000 हजार रुपये दिले जाणार आहे. चला तर या योजनेविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊयात. MKBY Scheme

या योजनेमार्फत पहिल्या मुलीच्या जन्मानंतर जे पालक 1 वर्षाच्या आत नसबंदी करतात, त्या मुलीच्या नावावर 50 हजार रुपये जमा केले जातात. तर तसेच, दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर पालकांनी कुटुंब नियोजन केल्यास दोन्ही मुलींच्या नावावर प्रत्येकी 25000-25000 रुपये बँकेत वितरित केले जातात. Majhi Kanya Bhagyashree Yojana 2022

मात्र या योजनेसाठी महाराष्ट्रातील एकाच व्यक्तीच्या दोन मुलींनाच या योजनेचा लाभ मिळतो. पहिल्या मुलीच्या जन्मानंतर 1 वर्षात आणि दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर 6 महिन्यांत पालकाने नसबंदी करणं बंधनकारक आहे. mazhi kanya bhagyashree yojana chi mahiti

योजनेची पात्रता
अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
या योजनेचा लाभ दोन मुलींनंतर नसबंदी करणाऱ्या पालकालाच मिळतो.
तिसरे अपत्य जन्मल्यास आधीच्या दोन्ही मुलींनाही योजनेचा लाभ मिळू शकत नाही. (mkby application form)

योजनेचा लाभ
‘माझी कन्या भाग्यश्री योजने’अंतर्गत मुलीच्या नावे किंवा तिच्या आईच्या नावाने बँक खाते उघडले जाते. या खात्यातच राज्य सरकार वेळोवेळी पैसे पाठवते.
मुलगी 18 वर्षांची झाल्यावर तिला पूर्ण रक्कम काढता येते. म्हणजेच या रकमेवर मुलीला व्याजाचे पैसे मिळत नाहीत.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलगी किमान दहावी पास आणि अविवाहित असायला हवी.
या योजनेअंतर्गत मिळालेली रक्कम, मुलींच्या शिक्षणासाठी वापरता येईल. Mazi Kanya Bhagyashree Scheme Maharashtra (MKBS) Eligibility

योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
अर्जदाराचे आधार कार्ड
आईचे किंवा मुलीचे बॅंक पासबुक
मोबाईल नंबर
पासपोर्ट साइज फोटो
पत्त्याचा पुरावा
उत्पन्नाचा दाखला (mazhi kanya bhagyashree yojana form)

योजनेचा लाभ घेण्यासाठी असा करा अर्ज
राज्यातील पात्र लाभार्थ्यांनी महाराष्ट्र शासन विभागाच्या अधिकृत वेबसाइटला https://www.maharashtra.gov.in/ भेट देऊन तेथून योजनेचा अर्ज डाउनलोड करावा. अर्जात विचारलेली माहिती व्यवस्थितपणे भरून, वरील दिलेली कागदपत्रे अर्जासोबत जोडा.

खालील लिंक वर क्लिक करून देखील तुम्ही GR डाउनलोड करू शकता. GR मधील पुष्ठ क्रमांक १३ ते २० मध्ये फॉर्म दिला आहे. तो फॉर्म ऑफलाईन म्हणजेच प्रत्यक्ष प्रिंट काढून भरायचा आहे. तसेच तुम्ही सर्व GR वाचून घेऊ शकता. GR मध्ये देखील सर्व माहिती आणि सूचना दिल्या आहेत.

ABDnews च्या माध्यमातून आम्ही विनंती करतो तुम्ही पात्र असल्यास नक्कीच या योजनेचा लाभ घ्या.

GR LINK- Click here to download the GR

mazhi kanya bhagyashree yojana registration online अर्ज भरल्यानंतर आणि कागदपत्रे जोडल्यावर हा अर्ज जवळच्या महिला व बाल विकास कार्यालयात सादर करावा.


हे देखील वाचा-


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!