Mofat Pithachi Girani Yojana 2023 | मोफत पिठाची गिरणी 2023

महाराष्ट्र सरकार महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी नेहमीच येऊन सुरू करत असते. त्या योजनांची माहिती घेऊन त्या तुमच्या पर्यंत अगदी सोप्या भाषेत पोहचवण्याचे काम आम्ही ABD News या पोर्टल च्या माध्यमातून करत असतो. आज आपण मोफत पिठाची गिरणी 2023 या योजनेबद्दल माहिती घेऊ.

योजनेच्या नावावरूनच तुमच्या लक्षात आले असेल की योजना कशा संदर्भात आहे. सरकारच्या या योजनेचा लाभ घेऊन महिलांना प्रत्येक महिन्याला चांगली कमाई करता यावी हा या योजने मागचा उद्देश आहे. मोफत पिठाची गिरणी गरीब आणि कष्टकरी महिलांना आत्मनिर्भर बनवेल असा सरकारचा अंदाज आहे. या योजनेचा फायदा शहरी तसेच ग्रामीण भागातील महिला घेऊ शकतात. या पिठाची गिरणीमुळे महिला कुटुंबाला आर्थिक हातभार लावू शकतात. (Mofat Pithachi Girani Yojana Maharashtra)

सरकारच्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला 18 ते 60 वर्षे वयोगटातील असणे आवश्यक आहेत. तसेच लाभार्थी महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाख 20 हजार पेक्षा कमी असणं आवश्यक आहे. घरबसल्या कष्ट करून स्वयंरोजगार उपलब्ध झाल्याने महिला हजारो रुपये कमवू शकतात. महिन्याला चांगली कमाई करता येते.

सध्या पुणे जिल्हा परिषद अर्ज सुरु आहेत. ईतर जिल्ह्यांचे अर्ज सुरु झाल्यावर त्याची माहिती आम्ही आमच्या ABD News Whatsapp ग्रुप वर प्रकशित करू

ZP Yojna Online Apply : जिल्हा परिषद पुणे अंतर्गत समाज कल्याण विभागाकडून या योजना राबवल्या जात आहेत. खाली अर्ज करण्याची लिंक दिली आहे तेथून तुम्ही ऑनलाईन अर्ज सादर करू शकता.

सायकल, मिरची कांडप यंत्र, पिठाची गिरणी, झेरॉक्स मशीन, 5 एचपी मोटर, अशा विविध योजनांसाठी जिल्हा परिषद पुणे अंतर्गत अर्ज मागविण्यात येत आहे.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
(Link-https://drive.google.com/file/d/1dft33k6pZULsdnSdWt6Bi7Ycfb8UV6_k/view)

योजनेच्या अधिक माहितीसाठी ग्रामपंचायत, पंचायत समितीत, जिल्हा परिषद मध्ये जाऊन माहिती करून घ्यावी.


आवश्यक कागदपत्रे

अर्जदार 12वी शिकलेल्या असल्याचा पुरावा
आधार कार्ड
अर्जदाराचा विहित नमुन्यातील अर्ज
घराचा 8अ उतारा
बॅंक पासबुक
लाईट बिल
उत्पन्नाचा दाखला

Similar Posts