मंत्री एकनाथ शिंदे आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या समर्थनार्थ सिल्लोड उद्या येथे भव्य रॅलीचे आयोजन.

सिल्लोड : राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडीमध्ये नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे व महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या समर्थनार्थ सिल्लोड शहरात भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आलेले असून या रॅलीमध्ये राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या समर्थनार्थ नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन देविदास पा. लोखंडे (पिंपळदरी) यांनी केले आहे.

उद्या दि. 26/6/2022 रविवार रोजी सकाळी 10:00 वाजता प्रमुख पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ सिल्लोड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यानंतर राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या संपर्क कार्यालयालयातून रॅलीला सुरुवात होणार असून अब्दुल सत्तार यांचे संपर्क कार्यालय ते प्रियदर्शनी चौक असा या रॅलीचा मार्ग असणार आहे.

प्रियदर्शनी चौक येथे रॅलीचे सभेत रूपांतर होवून सभेनंतरच रॅलीची सांगता होईल. मंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार व शिंदे गटातील इतर आमदारांना समर्थन देण्यासाठी सिल्लोड-सोयगाव तालुक्यामधील अब्दुल सत्तार समर्थकांनी या रॅलीत मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन देविदास पा. लोखंडे यांनी केले आहे.

राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची ही असणार या रॅलीला उपस्थिती

दरम्यान, या रॅलीमध्ये राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची सुद्धा उपस्थिती असणार आहे. उद्या सकाळी 10:00 वाजता सिल्लोड शहरातील महाराणा प्रताप चौक जवळ असलेल्या मैदानात राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे हेलिकॉप्टरने आगमन होणार आहे. त्यानंतर राज्यमंत्री अब्दुल सत्तार हे संपर्क कार्यालयामध्ये प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेणार घेऊन नंतर रॅलीत सहभागी होऊन प्रियदर्शनी चौक येथे सभेला मार्गदर्शन करतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!