व्हॉट्सॲप वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! आता कुणालाही न समजता व्हॉट्सॲप ग्रुपमधून बाहेर पडता येणार…!

गेल्या काही वर्षांत व्हॉट्सॲपच्या लोकप्रियतेत कमालीची वाढ झाली आहे. या प्लॅटफॉर्मच्या मदतीने, कोट्यवधी लोक त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात दररोज संवाद साधत आहेत. मात्र, या प्लॅटफॉर्मवर गोपनीयतेबाबत वाद निर्माण झाले असून व्हॉट्सॲप प्लॅटफॉर्मवरून यूजर्सचा डेटा लीक होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. सिग्नल आणि टेलिग्राम सारख्या मेसेजिंग ऍप्लिकेशन्सच्या वाढीचे सर्वात मोठे कारण म्हणजे हे प्लॅटफॉर्म गोपनीयता आणि वापरकर्त्याच्या डेटाबद्दल खूप कठोर मानले गेले आहेत. मात्र, आता व्हॉट्सॲप सुद्धा प्रायव्हसीबाबत नवीन उपाययोजना करणार आहे.

तुम्ही व्हॉट्सॲप ग्रुप मधून left झाला, हे कोणालाही कळणार नाही:

व्हॉट्सअ‍ॅपवर कुटुंब, मित्र आणि इतर अनेक व्यावसायिक ग्रुप बनलेले असतात आणि अनेक कारणांमुळे लोक या ग्रुपमधून बाहेर पडू शकत नाहीत असे अनेकदा दिसून येते. कौटुंबिक ग्रुप सोडताना नातेवाईकांना राग येतो. मित्रांचा ग्रुप सोडताना मित्रांना राग येतो आणि व्यावसायिक ग्रुप सोडल्यास बॉस तुमच्यावर रागवण्याचा धोका असतो. अशा परिस्थितीत व्हॉट्सॲपच्या या नवीन फीचरमुळे युजर्सना मोठा दिलासा मिळणार आहे. वास्तविक, या नवीन फीचरनुसार यूजर्स आता कोणताही ग्रुप सोडू सोडल्यावर ग्रुपमधील बाकीच्या लोकांना कळणार सुद्धा नाही. याची माहिती फक्त ग्रुपच्या ॲडमिनला असेल. रिपोर्ट्सनुसार, हे फीचर या महिन्यात व्हॉट्सॲप यूजर्ससाठी आणले जाऊ शकते.

वेगवेगळ्या लोकांसाठी वेगवेगळे ऑनलाइन किंवा ऑफलाइन स्टेटस्

बर्‍याच वेळा असे होते की व्हॉट्सॲप वापरकर्त्यांना त्यांचे ऑनलाइन स्टेटस काही लोकांना दाखवायचे नसते. तथापि, आत्तापर्यंत पर्याय असा होता की तुम्ही एकतर तुम्हाला सर्वांसाठी ऑफलाइन होता येईल किंवा प्रत्येकाला तुम्ही ऑनलाइन दिसाल. पण या नवीन फीचरमध्ये व्हॉट्सॲप युजर्सना तुम्ही कोणाला ऑनलाइन दिसावे आणि कोणाला ऑफलाइन असल्याचे स्टेटस दाखवायचे आहे, यासाठी ही सुविधा देणार आहे. असे मानले जात आहे की हे फीचर देखील या महिन्यात आणले जाऊ शकते.

स्क्रीनशॉट काढणे होईल ब्लॉक.

व्हॉट्सॲपमध्ये एक खास फीचर आहे जे यूजर्समध्ये खूप लोकप्रिय आहे. व्ह्यू वन्स असे या फीचरचे नाव असून या फीचरनुसार लोक कायमस्वरूपी डिजिटल रेकॉर्डशिवाय फोटो किंवा मीडिया शेअर करू शकतात आणि हा मेसेज एकदाच पाहता येतो. आता व्हॉट्सॲप या फीचरमध्ये सुरक्षेचा आणखी एक स्तर आणणार असून या अपडेट केलेल्या फीचरनुसार, लोक व्ह्यू वन्स फीचर मधील फोटो एकदा पाहू शकाल परंतु त्या फोटोचा स्क्रीनशॉट घेऊ शकणार नाहीत. व्ह्यू वन्स मधील स्क्रीनशॉट ब्लॉक करणाऱ्या या फीचर्सची चाचणी सुरू असून ते लवकरच व्हॉट्सॲप वापरकर्त्यांसाठी आणले जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!