मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर सरकारचं खातेवाटपही जाहीर, कोणतं खातं कुणाला? जाणून घ्या…

राज्यात शिंदे-फडणवीस नेतृत्वात सरकार स्थापन होऊन तब्बल महिना लोटल्यावर अखेर काल दिनांक ९ ऑगस्ट २०२२ मंत्रिमंडळ विस्ताराचं घोडं गंगेत न्हालं. या मंत्रिमंडळाच्या विस्तारात शिंदे गटातील 9 आणि भाजपाचे 9 अशा 18 मंत्र्यांचा शपथविधी कल पार पडला. काल मंगळवारी सकाळी 18 मंत्र्यांच्या शपथविधीनंतर लगेच काल रात्री खातेवाटप सुद्धा जाहीर झालं आहे.

या खातेवाटपानंतर नगरविकासाचे खाते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तर गृह, अर्थ, आणि महसूल अशी महत्वाची खाती भाजपाकडे ठेवण्यात आले आहे.

कोणत्या मंत्र्याकडे दिलं कोणत्या खात्याचा भार ?

एकनाथ शिंदे – मुख्यमंत्री, नगरविकास
देवेंद्र फडणवीस – उपमुख्यमंत्री, गृह, अर्थ
राधाकृष्ण विखे पाटील – महसूल
चंद्रकांत पाटील – सार्वजनिक बांधकाम

सुधीर मुनगंटीवार – ऊर्जा, वन
मंगलप्रभात लोढा – विधी व न्याय
रविंद्र चव्हाण – गृहनिर्माण
उदय सामंत – उद्योग
दीपक केसरकर – पर्यावरण, पर्यटन
सुरेश खाडे – सामाजिक न्याय
दादा भुसे – कृषी

गुलाबराव पाटील – पाणीपुरवठा
गिरीश महाजन – जलसंपदा
विजयकुमार गावित – आदिवासी विकास
अब्दुल सत्तार – अल्पसंख्याक विकास
अतुल सावे – आरोग्य
तानाजी सावंत – उच्च व तंत्रशिक्षण
संजय राठोड – ग्रामविकास
शंभुराज देसाई – राज्य उत्पादन शुल्क
संदीपान भुमरे – रोजगार हमी

महत्त्वाची खाती भाजपकडेच
राज्य सरकारच्या खातेवाटपामध्ये भाजपकडेच महत्त्वाची खाती आल्याचे दिसत असून समोर आलेल्या यादीवरून नगरविकास खातं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे ठेवण्यात आले असले तरी गृह, अर्थ व महसूल ही तीन महत्त्वाची खाती भाजपाकडे गेलेली असून, गृह व अर्थ ही खाती देवेंद्र फडणवीस हे संभाळणार आहे. तर महसूल खाते राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे देण्यात आले आहे. तसेच, गिरीश महाजन यांच्याकडे जलसंपदा, सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे उर्जा तर चंद्रकांत पाटील यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खाते दिले आहे.

Similar Posts