Animal Review Marathi 1 : रणबीर कपूरचा ‘ॲनिमल’ खतरनाक; अंगावर शहारे आणणारा परफॉर्मन्स

Animal Review Marathi रणबीर कपूरचा ‘ॲनिमल’ हा चित्रपट पाहिल्यानंतर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया आल्या आहे. प्रेक्षकांना हा चित्रपट कसा वाटला, ते पाहुयात..

Animal Review Marathi

हिंदी स्टार रणबीर कपूर आणि तेलगू स्टार रश्मिका मंदाना यांचा बहुचर्चित ‘ॲनिमल’ हा चित्रपट नुकताच सिनेमागृहात रिलीज झाला आहे. ‘ॲनिमल’ चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगने भले भले विक्रम मोडले होते. त्यामुळे फर्स्ट डे फर्स्ट शो पाहण्यासाठी सुद्धा प्रेक्षकांची चांगली गर्दी थिएटरमध्ये जमली. प्रेक्षकांना रणबीरचा हा ॲक्शन चित्रपट कसा वाटला, याविषयी जाऊन घ्या Animal Review Marathi.

संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित ‘ॲनिमल’ या चित्रपटाला प्रेक्षकांनी ‘ब्लॉकबस्टर’बरोबरच खतरनाक सुद्धा म्हटलंय. याआधी संदीप रेड्डी वांगाने तेलुगूमधील ‘अर्जुन रेड्डी’ आणि हिंदीमधील ‘कबीर सिंग’चं दिग्दर्शन केलं होतं.

रणबीरची पत्नी अभिनेत्री आलिया भट्टने प्रीमिअर शो पाहिल्यानंतर सोशल मीडियावर ‘खतरनाक’ असं लिहिलंय. अनेकजण चित्रपटातील रणबीरच्या दमदार अभिनयाने फारच प्रभावित झाले आहेत. ‘गँग्स ऑफ वासेपूर’नंतर हा सर्वांत मोठा भारतीय चित्रपट ठरणार असल्याचा अंदाज सुद्धा काहींनी व्यक्त केला आहे. रणबीरच्या सोबतच अनिल कपूर व बॉबी देओल यांच्या सुद्धा अभिनयाचं कौतुक होत आहे. चित्रपटातील‘पहिली 25 मिनिटं आणि रणबीरच्या अप्रतिम अभिनयामुळे अंगावर काटाच आला.

अवकळीच्या नुकसान भरपाईच्या यादीत तुमचे नाव पाहण्यासाठी क्लिक करा

‘ॲनिमल’ हा सिनेमा 1 डिसेंबर 2023 रोजी जगभरात प्रदर्शित झाला. रणबीर कपूरने या चित्रपटात अर्जुन नावाच्या गँगस्टरची भूमिका साकारलेली आहे. हा गँगस्टर अत्यंत निर्दयी आणि तितकाच महत्त्वाकांक्षी सुद्धा आहे. आपलं ध्येय साध्य करण्याकरिता तो कोणत्याही टोकाला जायला तयार असतो. संघटित गुन्हेगारीचं एक वेगळंच विश्व या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे. विश्वासघात बरोबरच सत्तासंघर्ष हे या चित्रपटातल्या गुन्हेगारी विश्वात सातत्याने पहायला मिळतं. अर्जुन हा याच अंडरवर्ल्डमधील एक उगवता तारा असतो, आणि त्याला स्वत:चं अस्तित्व स्थापित करायचं असते. आणि याच मुळे तो आणि बॉबी देओल एकमेकांसमोर येतात. रणबीर कपूर सोबतच बॉबी देओलच्याही भूमिकेचे विशेष कौतुक होत आहे. याशिवाय या चित्रपटात अनिल कपूर आणि रश्मिका मंदाना यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

‘अ‍ॅनिमल’चं कथानक काय? (Animal Review Marathi)

वडिलांवर प्रेम करणाऱ्या एका महत्वकांक्षी मुलाची गोष्ट या सिनेमात दाखवण्यात आली असून या चित्रपटामध्ये अनिल कपूर (Anil Kapoor) यांनी रणबीर कपूरच्या वडिलांची भूमिका साकारलेली आहे. त्या मुलाचे वडिलांवर खूप प्रेम असतं तर वडील मात्र त्यांच्या मुलावर प्रेम करत नाहीत. दरम्यान अनिल कपूरवर हल्ला होतो आणि तेव्हाच खऱ्या अर्थाने चित्रपट ट्विस्ट येतो. रणबीर कपूर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा शोध घ्यायला लागतो, आणि या भोवती संपूर्ण कथानक फिरत राहते ‘ ॲनिमल’ या चित्रपटाची गोष्ट साधी सरळ असून यातील ट्विस्ट तुमचं चांगलच मनोरंजन करतील. (Animal Review Marathi)

‘अ‍ॅनिमल’ कसा आहे?

‘अ‍ॅनिमल’ हा एक मसालापट आहे. शिक्षकांच्या शिट्ट्या आणि टाळ्या येतील असे अनेक सीन्स या सिनेमामध्ये आहेत. ‘अ‍ॅनिमल’ या चित्रपटाची सुरुवात थोडी संथ आहे. पण नंतर मात्र या चित्रपटातील कथेला गती येते. दुसऱ्या भागात तर एकापेक्षा एक भारी सीन आहेत ज्यामुळे चित्रपट पाहताना नक्कीच तुम्हाला मजा येईल.

‘अ‍ॅनिमल’ चित्रपटामध्ये अनेक ॲक्शन सीन दाखवण्यात आलेले आहेत. एखाद्या ठिकाणी या ॲक्शनचा दृश्यांचा वापर करायला नको होता, असंही वाटायला लागतं. बॉबी देओलच्यावर या चित्रपटाला प्रमोट करण्यात आलं आहे. पण खरंतर तो या चित्रपटाचसोबत जास्त जोडलेला नाही. कुटुंबावर भाष्य करणारा हा चित्रपट असल्याने प्रेक्षकांना भावनिक करतो. सिनेमात महिलांबद्दल केलेल्या काही भाष्यामुळे यावर टीकाही होऊ शकते. (Animal Review Marathi)

रणबीरच्या अभिनयाची कमाल

रणबीर कपूर सिनेमात ‘बाप-बाप’ करत असला तरी सुद्धा हा चित्रपट (Animal Review Marathi) पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की रणबीर आता अभिनयाच्या बाबतीत बाप झाला आहे. रणबीरने कमालीचे काम केलं आहे. ॲक्शन असो किंवा भावनात्मक सीन सिनेमातील प्रत्येक फ्रेममध्ये रणबीर कपूर लक्ष वेधून घेतो. ॲनिमल हा चित्रपट रणबीरच्या करिअरमधला गेम चेंजर चित्रपट ठरू शकतो. रोमँटिक हिरो म्हणून असलेली इमेज त्याने क्रॅक केलेली आहे. बॉबी देओलची भूमिका छोटी असली तरी त्याने ती चोख निभावली आहे. (Rashmika Mandanna) रश्मिका मंदाना ने सुद्धा तिच्या भूमिकेला योग्य तो न्याय दिला आहे. तर वडिलांच्या भूमिकेत अनिल कपूर यांचा अभिनय (Anil Kapoor) जबरदस्त आहे. एकंदरीतच सिनेमातील सर्वच कलाकारांनी चांगलं काम केलं आहे.

2 तास 21 मिनिट प्रेक्षकांना होल्ड करणं कठीण आहे पण दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांनी ते उत्तम जमवलं आहे. सिनेमातीचं संगीत सुद्धा चांगलं झालं आहे. एकंदरीतच काय तर ‘ॲनिमल’ हा सिनेमा तुमचं चांगलच मनोरंजन करेल. Animal Review Marathi

अॅनिमल चा रिव्यू वाचा हिन्दीमध्ये सुद्धा

Similar Posts