Government Loan Scheme for Farmers | शेतकऱ्यांना पाहिजे तितके कर्ज मिळणार कमी व्याजदरात, सरकारची खास योजना

Government Loan Scheme for Farmers

Government Loan Scheme for Farmers: राज्य तसेच केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी चांगल्या योजना राबवत असते. शेतकऱ्यांना सरकारकडून छोट्या गोष्टींपासून ते मोठ्या गोष्टीपर्यंत मदत मिळते. शेतकऱ्यांना शेती सोयीस्कर व्हावी यासाठी सरकार योजनांच्या माध्यमातून प्रोत्साहन देत असते.

government loan scheme शेतकऱ्यांसाठी पीएम किसान योजना, सौर कृषी पंप योजना, कृषी यंत्रांसाठीही अनुदान देणाऱ्या तसेच गोठा आणि गाई-म्हशी खरेदी करता येणाऱ्या योजनाही सरकार अनुदान देऊन पुरवत असते. अशीच केंद्र सरकारची खास योजना आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक बळ मिळणार आहे. (krushi payabhut suvidha yojana)

केंद्र सरकारच्या कृषी सहकार व शेतकरी कल्याण विभागामार्फत 2020-21 ते 2029-30 या कालावधीसाठी कृषी पायाभूत सुविधा योजना राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत शेतकर्‍यांच्या नाशवंत कृषी मालाच्या काढणीवेळी नुकसान कमी करण्यासाठी पायाभूत सुविधा, सामुदायिक शेती मालमत्ता प्रोत्साहनासाठी व आर्थिक सहाय्य दिले जाते.

योजनेसाठी हे प्रकल्प पात्र आहे
1) ई-मार्केटिंग प्लॅटफॉर्म
2) गोदाम
3) पॅक हाऊस
4) मुरघास
5) संकलन केंद्र
6) वर्गवारी आणि प्रतवारीगृह
7) शीतगृह
8) पुरवठा सुविधा
9) प्राथमिक प्रक्रिया केंद्र
10) रायपनिंग चेंबर आणि सामूहिक शेती
11) प्राथमिक उद्योग (government scheme for farmers in maharashtra)

शेतकऱ्यांना मिळणार कर्ज..
केंद्र सरकारमार्फत या योजनेंतर्गत कृषी पायाभूत सुविधा प्रकल्पांना वित्तपुरवठा करण्याकरिता 1 लाख कोटी रुपये इतक्या कर्जाची तरतूद करण्यात आली आहे. Government Scheme महाराष्ट्र राज्यासाठी 8 हजार 460 कोटी रुपये कर्जाची तरतूद करत त्यावर 2 कोटी मर्यादेपर्यंतच्या सर्व कर्जांवर वार्षिक 3 टक्के व्याज सवलत आहे.

योजनेत सहभागी होण्यासाठी असा करा अर्ज
या योजनेत सहभागी होण्यासाठी ऑनलाईन पोर्टलवर नोंदणी करून अर्ज करावा लागतो. (Government Scheme for Farmers) अर्जासह तपशीलवार प्रकल्प अहवालाची मूळ प्रत आणि प्रकल्प अहवालाशी संबंधित कागदपत्रे पोर्टलवर अपलोड करून अर्ज सादर करावा लागतो. त्यानंतर पडताळणी करून अर्जदाराच्या बॅंक खात्यावर निधी वितरित केल्या जातो.


हे देखील वाचा –


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!