जितका वाहनाचा वापर, तितकाच विम्याचा खर्च; कसा मिळेल IRDAI च्या नवीन नियमांचा फायदा, जाणून घ्या..

New Car Insurance Rules 2022 : IRDAI च्या नवीन नियमानुसार आता महाग कार विम्याची (Car Insurance) काळजी करण्याची आवश्यकता नाही. विमा नियामक IRDAI ने कार विम्याचे नवीन नियम जाहीर केले असून. आता वाहन मालकांना वाहन चालविण्याच्या पद्धतीनुसार कार विम्याचा प्रीमियम निवडण्याची मुभा असणार आहे.

IRDAI New Rules For Motor Insurance: वाहन चालकांसाठी एक गोड बातमी आहे. कारण आता कार विम्याचे (car Insurance) महागडे दर विसरून जा. विमा नियामक IRDAI (Insurance Regulatory and Development Authority of India) ने बुधवारी नवीन नियमांची घोषणा केली असून आता वाहन धारक वाहन विम्याकरता किती पैसे द्यायचे ते ठरवू शकतात. आणि हे नवीन नियम लगेच लागू देखील करण्यात आले असून विमा नियामकाने सामान्य विमा कंपन्यांना ॲड-ऑन जारी करण्याची परवानगी देखील देण्यात आली आहे.

ज्यामुळे एखाद्या व्यक्तीला त्याच्या वाहन चालवण्याच्या सवयींचा फायदा घेता येईल. यामध्ये Pay As You Drive गाडी चालवताना पैसे द्या) आणि Pay How You Drive या सारख्या फीचर्सचा समावेश करण्यात आलेला आहे. या अंतर्गत आता वाहनचालकांना वाहन चालवण्याच्या पद्धतीप्रमाणे कार विम्याचा (car insurance) प्रीमियम निवडता येणार असून त्यासाठी टेलीमॅटिक्स-आधारित कार विमा योजना वाहनाचा वापर अथवा ड्रायव्हिंगच्या सवयीवर आधारित प्रीमियम रक्कमेत बदल करेल.

गाड्या अनेक, इन्श्योरन्स एक (Many cars, one insurance)

कार विमा अधिक परवडणारा बनवणे हाच नवीन बदलांमागचा एकमेव आणि मुख्य उद्देश असून विमा कंपन्यांना पे ॲज यू ड्राईव्ह Pay (As You Drive), पे हाऊ यू ड्राईव्ह Pay How You Drive) + फ्लोटर पॉलिसी सुरू करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. या शिवाय IRDAI ने एक महत्त्वाची घोषणा सुद्धा केली आहे की, जर कोणा व्यक्तीकडे एकापेक्षा जास्त वाहने असतील, तर त्याला टेलीमॅटिक्स आधारित मोटर विमा योजनेचा वापर करून नवीन नियमांप्रमाणे मात्र एका विमा प्रीमियमसह इन्श्योरन्स कव्हरेज मिळेल.

त्यामुळे आता वाहन धारकांना वेगवेगळ्या वाहनांकरीता एकापेक्षा अधिक पॉलिसी घेण्याची आवश्यकता नाही. IRDAI च्या म्हणण्याप्रमाणे, हे आरोग्य विम्याच्या फ्लोटर पॉलिसीसारखंच असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!