शेळीपालन योजना २०२३| मिळणार ५०% सबसिडी! अर्ज कसा करावा? काय आहेत नियम व अटी..

शेळीपालन योजना २०२३ | शेतकरी बांधवांसाठी तसेच पशुपालन शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यांमध्ये शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासासाठी जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय योजना सुरू झालेल्या आहेत.

शेळीपालन योजना २०२३

शेती म्हटलं म्हणजे आजच्या पर्यावरणाचा स्थिती बघता खूप अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे जोडधंदा करणे हे शेतकऱ्यासाठी गरजेचं झालं आहे  शेतकरी आज अवकाळी पाऊस, सिंचनाची उपलब्धता नसणे, पाण्याची आणि विजेची टंचाई अशा कित्येक समस्यांना तोंड देत असतो. ज्याचा परिणाम पिकांच्या योग्य वाढीवर होत असतो. पिकांची वाढ योग्य प्रमाणात होत नाही आणि मग हवा तेवढा हमीभाव मिळत नाही. ज्याचा परिणाम शेतकऱ्याच्या आर्थिक परिस्थितीवर होतो. त्यासाठी जोडधंद्यांना उभारी म्हणून सरकार नवनवीन योजना राबवत आहे. त्याच अंतर्गत सरकारने शेळीपालन अनुदान योजना २०२३ ही नवीन योजना राबविली आहे. जेणेकरून शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासासाठी आवश्यक ते प्रयत्न व्हावे.

या योजनेअंतर्गत १०० शेळ्या आणि ५ बोकड घेण्यासाठी दहा लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळणार आहे. ज्यामध्ये जास्तीत जास्त ५० टक्के इतकी सबसिडी सुद्धा मिळणार आहे. जेणेकरून सबसिडी मधून जोडधंदा सुरू करता येईल आणि ह्या व्यवसायातून शेतकरी उत्पन्न घेऊ शकतात. अल्पभूधारक शेतकऱ्यांना या योजनेचा विशेष लाभ होणार आहे.

योजनेच्या माध्यमातून राज्यातील जनतेला रोजगार उपलब्ध होणार आहे. शेळीपालन करून शेळीचे दूध विकू शकतात. शेतकऱ्यांना उत्पन्नाचा नवा स्रोत उपलब्ध होणार आहे. योजनेच्या माध्यमातून व्याजावर सबसिडी दिली जाईल, ज्यामुळे कर्जाची परतफेड करणे खूप सोपे होईल.

शेळीपालन अनुदान योजना २०२३, काय आहेत अटी व शर्ती ??

येथे क्लिक करा.

हे देखील वाचा-

  1. विहिरीला व बोअरला पाणी कुठे लागणार, आता तुम्ही पाहू शकणार
  2. मोबाईल नंबर टाकून कोणाचेही लाईव्ह लोकेशन बघा
  3. घरावर सोलर लावण्यासाठी सरकार देत आहे प्रत्येकाला १००% अनुदान. असा करायचा आहे ऑनलाइन अर्ज
  4. अशा प्रकारे सुरू करा शेळीपालन. यश नक्कीच मिळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!