आता WhatsApp आणि Truecaller रोखणार Spam कॉल्स; घेऊन येत आहे ‘हे’ नवीन फिचर…

आपल्या देशात सायबर क्राईमच्या गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असून फ्रॉड करण्यासाठी हॅकर्स calling, SMS आणि इन्स्टंट मेसेजिंग Apps द्वारे नागरिकांपर्यंत पोहोचत आहेत. सध्या SPAM करण्यासाठी सर्वात जास्त वापरले जाणारे मेसेजिंग Apps म्हणजे WhatsApp. WhatsApp हे एक सर्वात जास्त प्रसिद्ध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. यावरून तुम्ही एकमेकांशी संवाद साधू शकतो. आपले फोटोज, व्हिडिओ एकमेकांना शेअर करू शकता. VIDEO आणि VOICE कॉल्स करू शकता.

WhatsApp चे भारतात तब्बल ५०० दशलक्ष सक्रिय वापरकर्ते आहेत. पण आता WhatsApp वापरकर्त्यांना spam पासून वाचवण्याकरिता Truecaller ने META शी हातमिळवणी केली आहे. जेणेकरून वापरकर्त्यांना SPAM मेसेजना ओळखून त्यांना ब्लॉक करण्यात मदत होईल. भारतातील प्रसिद्ध CALLER ID आणि SPAM BLOVKING असलेले सॉफ्टवेअर Truecallers वापरकर्त्यांना इंटरनेटवरून संभाव्य स्पॅम कॉल शोधण्यात WhatsApp वापरकर्त्यांना मदत करण्यासाठी WhatsApp आणि दुसऱ्या मेसेजिंग अ‍ॅप्सवर IDENTIFICATION सर्व्हिस सुरु करण्याचा विचारात आहे. हे फिचर मे महिन्याच्या शेवटी जागतिक स्तरावर आणण्यात येणार असल्याचे Truecaller चे Chief Executive अ‍ॅलन मामेदी यांनी सांगितले.

इंटरनेटवरील spam कॉल्सशिवाय Telecom regulater असणाऱ्या Trai ने देखील टेलिकॉम कंपन्यांना offline येणाऱ्या spam call आणि SMS ब्लॉक करण्यास सांगितले असून याकरिता टेलिकॉम कंपन्या Jio आणि Airtel यांनी AI सिस्टिमवर आधारित सेवा रोलआऊट करण्यास सुरुवात केलेली आहे. Truecaller चे सह-संस्थापक आणि CEO अ‍ॅलन मामेदी म्हणाले की, भारतात spam call ही एक मोठी समस्या आहे. जिथे whatsapp वापरकर्त्यांना दर महिन्याला कमीत कमी १७ spam कॉल्स येतात.

WhatsApp messagener साठी Truecaller चे spam direction कसे वापरालं ?

1️⃣ सर्वात पहिले Play Store वर जाऊन Truecallerच्या बीटा प्रोग्राममध्ये सामील व्हावे.
▪️त्यानंतर लिस्टिंग पेज स्क्रोल करून बीटा टेस्टर सेक्शनमध्ये join बटणावर क्लिक करावे.
▪️थोड्या वेळानंतर परत Play Storeवर ट्रूकॉलर सर्च करावे.
▪️त्यानंतर बीटा अपडेट install करा.

2️⃣ मग WhatsApp आणि अन्य मेसेजिंग Apps साठी callar id कसे अ‍ॅक्टिव्ह करालं ?

▪️ Truecaller ओपन करून सेटिंग्जमध्ये जावे.
▪️ कॉलर आयडीवर क्लिक करा आणि त्यानंतर Whatsapp आणि दुसऱ्या मेसेजिंग apps मध्ये अनोळखी नंबर ओळखण्यासाठी toggle चालू करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!