MSRTC Big News | राज्यातील या प्रवाशांना देखील मोफत प्रवास मिळणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

MSRTC Big News: सर्वांची आवडती लालपरी म्हणजेच एसटी.. एसटीचा प्रवास म्हणजेच सुखाचा प्रवास.. एसटी म्हणजेच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ.. कोरोना काळात एसटी बंद होती. त्यानंतर एसटी कर्मचारी 5 ते 6 महिने संपावर गेले. त्यामुळे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे आर्थिक नुकसान झाले.

एसटीला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी एसटी महामंडळ, तसेच राज्य सरकार सातत्याने प्रयत्न करीत आहे. यामध्येच राज्य सरकारने निर्णय घेतला आहे, ज्यामध्ये राज्यातील 1 हजार एसटी बसचे डिझेलवरून सीएनजीमध्ये रुपांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (senior citizen msrtc smart card)

Senior Citizen Card एसटी एवढ्या संकटातून जाऊन देखील राज्य सरकार एसटी प्रवाशांसाठी खास योजना राबवते. राज्यातील 65 वर्षे पूर्ण केलेल्या नागरिकांना भाड्यात 50 टक्के सवलत दिली जाते. मात्र, आता एसटी प्रवाशांना भाड्यात 100 टक्के सवलत दिली जाणार आहे. (msrtc big news today)

या 15 ऑगस्ट 2022 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली आहे. (ST Mofat Pravas Yojana) भारतीय स्वातंत्र्याच्या या अमृत महोत्सवानिमित्त वयाची 75 वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना एसटी बसमधून मोफत प्रवास करता येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

ज्येष्ठ नागरिकांना स्मार्ट कार्डद्वारे सवलतीच्या दरात एसटी प्रवास करता येत होता. मात्र, आता वयाची 75 वर्षे पूर्ण केलेल्या नागरिकांना एसटीने मोफत प्रवास करता येणार आहे. (st bus free for 75 year old) यासाठी जेष्ठ नागरिकांकडे स्मार्ट कार्ड असणं आवश्यक आहे. (senior citizen conservation of msrtc)

msrtc 75 years old pass राज्य सरकार एसटी प्रवाशांसाठी भाड्यावर विविध प्रकारच्या सवलत देत आली परंतु, आता शिंदे सरकारने चक्क 75 वर्षे पूर्ण असलेल्या नागरिकांना भाड्यावर 100 टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच 75 वर्षांपुढील, नागरिकांना मोफत प्रवास दिल्या जात आहे.


हे देखील वाचा –


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!