एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या पॅनकार्डचे काय करायचे? काय आहे आयकराचा नियम? जाणून घ्या..

Rules of PAN Card : आयकर विभागाकडून पॅन कार्ड जारी केले जाते. कोणत्याही मृत व्यक्तीच्या पॅनकार्डबाबत प्राप्तिकर विभागाने काही नियम केले आहेत.

पॅन कार्ड आणि आधार कार्डची उपयुक्तता भारतात खूप वेगाने वाढली आहे. आजकाल कोणतेही आर्थिक काम करण्यासाठी या दोन्ही कागदपत्रांची गरज भासते.बर्‍याच वेळा आपली महत्त्वाची कामे पॅनकार्ड न मिळाल्याने अडकून पडतात. अशा परिस्थितीत पॅनकार्ड ठेवणे खूप गरजेचे आहे, परंतु अनेकदा असे दिसून आले आहे की, एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर लोक आपले पॅन कार्ड ठेवणे विसरतात. यामुळे अनेक वेळा फसवणूक करणारे लोक या पॅनकार्डचा गैरवापर करतात.

अलिकडच्या काळात, अशा अनेक प्रकरणे समोर आली आहेत जेव्हा मृत लोकांच्या पॅनकार्डद्वारे बँका आणि वित्तीय कंपन्यांकडून कर्ज घेण्यात आले होते. अशा परिस्थितीत अशा फसवणुकीच्या घटना टाळण्यासाठी लोकांनी काय करावे? हा प्रश्न तुमच्याही मनात निर्माण होत असेल. जाणून घ्या या बाबत सविस्तर…

काय आहे आयकर नियम?
आयकर विभागाकडून पॅन कार्ड जारी केले जाते. कोणत्याही मृत व्यक्तीच्या पॅनकार्डबाबत प्राप्तिकर विभागाने काही नियम केले आहेत. या नियमांनुसार, एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास, अशा स्थितीत त्याचे पॅन कार्ड निष्क्रिय करावे लागेल किंवा सरेंडर करावे लागेल. आम्ही तुम्हाला मृत व्यक्तीचे पॅन कार्ड निष्क्रिय करणे किंवा सरेंडर करण्याच्या प्रक्रियेबद्दल सांगत आहोत.

पॅन कार्ड कसे सरेंडर करावे-
तुम्हाला तुमच्या नातेवाईकांपैकी कोणाचे पॅनकार्ड सरेंडर करायचे असेल, तर सर्वप्रथम मूल्यांकन अधिकाऱ्याला अर्ज लिहा. यासोबतच तुम्हाला या अर्जात पॅन कार्ड सरेंडर करण्याचे कारणही लिहावे लागेल. यासोबतच मृत व्यक्तीचे नाव, जन्मतारीख, मृत्यू प्रमाणपत्र, पॅन क्रमांक आदी सर्व माहितीही येथे टाकावी लागणार आहे. त्यानंतर ते मृत्यू प्रमाणपत्रासोबत जोडून सादर करावे लागेल. यासोबतच भविष्यातील गरजांसाठी अर्जाची प्रत ठेवावी लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!