FCI Recruitment 2022

FCI Recruitment 2022 | नोकरी: FCI मध्ये 5043 जागांसाठी मेगा भरती, पगार 1 लाखांपर्यंत, करा अर्ज

FCI Recruitment 2022

FCI Recruitment 2022: देशातील तरुणांसाठी नोकरीची संधी उपलब्ध.. भारतीय खाद्य निगम (Food Corporation of India) अंतर्गत भरती करण्यात येत आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज 6 सप्टेंबर 2022 पासून सुरू होणार आहे.

या लेखात पदाचे नाव आणि जागा, शैक्षणिक पात्रता, पगार, ऑनलाईन अर्ज प्रक्रिया, नोकरी ठिकाण व‌ ऑनलाईन अर्ज कुठे करायचा, याबाबत संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी ही महत्वपूर्ण माहिती जाणून घ्या व संपूर्ण जाहिरात वाचून घ्या. (Food Corporation of India Recruitment 2022)

FCI Recruitment 2022 पदाचे नाव –


1) सहाय्यक श्रेणी 3 (Assistant Grade 3)
2) कनिष्ठ अभियंता (Junior Engineer)
3) टंकलेखक आणि लघुलेखक ग्रेड-2 (Steno Grade-2)

FCI Recruitment 2022 शैक्षणिक पात्रता –

सहाय्यक श्रेणी 3 (Assistant Grade 3 – तांत्रिक) – अर्जदार कृषी/ वनस्पतिशास्त्र/ बायोटेक/ फूड इ. मध्ये असणं आवश्यक आहे.
सहाय्यक श्रेणी 3 (Assistant Grade 3 – सामान्य) – कोणत्याही मान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून पदवीधर असावा. तसेच संगणकाचे ज्ञान असणं आवश्यक आहे.
सहाय्यक श्रेणी 3 (Assistant Grade 3 – खाते) – B.com क्षेत्रात पदवी आणि संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
सहाय्यक श्रेणी 3 (Assistant Grade 3 – डेपो) – अर्जदार संगणकाचे ज्ञान असणारा पदवीधर असावा.
कनिष्ठ अभियंता (Junior Engineer – EME) – अर्जदाराकडे 1 वर्षाच्या अनुभवासह EE/ME अभियांत्रिकीमध्ये पदवी किंवा डिप्लोमा झालेला असावा.
कनिष्ठ अभियंता (Junior Engineer – Civil) – अर्जदाराकडे 1 वर्षाच्या अनुभवासह सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये पदवी किंवा डिप्लोमा झालेला असावा.
हिंदी टायपिस्ट सहाय्यक श्रेणी 3 (Assistant Grade 3 – हिंदी) – अर्जदार पदवीधर असावा आणि हिंदी टायपिंगमध्ये 30 शब्द प्रति मिनिट वेग असावा. तसेच भाषांतराचा कमीत कमी एक वर्षाचा अनुभवही असणं आवश्यक आहे.
टंकलेखक आणि लघुलेखक ग्रेड-2 (Steno Grade-2) – DOEACC ‘O’ स्तर प्रमाणपत्रासह पदवीधर असावा. तसेच टायपिंग आणि स्टेनोचे काम देखील येणं आवश्यक आहे.

ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख – उमेदवारांना 6 सप्टेंबर 2022 पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. (FCI Recruitment 2022 Exam Date)

ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख – ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर 2022 आहे. (FCI Recruitment 2022 Last Date)

पगार – पगार जाणून घेण्यासाठी तुम्हाला जाहिरात वाचावी लागेल. जाहिरात डाऊनलोड कशी करायची याबाबत पुढे सांगितले आहे.

नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत (FCI Notification 2022)

FCI Recruitment 2022 Apply Online ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढील दिलेल्या लिंकवर क्लिक करा

👉 https://fci.gov.in/

अधिकृत वेबसाईट (Official Website) – https://fci.gov.in/

या भरतीची संपूर्ण माहिती या लेखात जाणून घेतली आहे. तरी देखील उमेदवारांनी या भरतीची संपूर्ण जाहिरात वाचून ऑनलाईन अर्ज करा. जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी https://fci.gov.in/ या वेबसाईटवर जा. (FCI Recruitment 2022 PDF) तसेच ही जॉब अपडेट पुढे तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा.

हे देखील वाचा-

Similar Posts