Gram Panchayat Bandhkam Parvana | ग्रामपंचायतमध्ये बांधकाम परवाना असा मिळवा

Gram Panchayat Bandhkam Parvana: प्रत्येक ग्रामीण भागातील नागरिकांची इच्छा असते की, आपले देखील छान, टुमदार घर असावं.. यामध्ये जर तुम्ही ग्रामपंचायत हद्दीत घर बांधत असाल किंवा दुकान टाकत असाल तर यासाठी बांधकाम परवानगी लागते. बांधकाम परवानगी नाही काढली तल अनधिकृत बांधकाम ठरविल्या जाईल.

Gram Panchayat Bandhkam Parvana

ग्रामपंचायत हद्दीत घर किंवा दुकान बांधले असेल आणि बांधकाम परवानगी काढलेली नसेल, तर तुम्ही अडचणीत येऊ शकता. तुमचे देखील घर किंवा दुकान ग्रामपंचायत हद्दीत असेल, तर बांधकाम परवानगी मिळून घ्या. बांधकाम परवानगी करिता तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही.

Bandhakam Parvana Gram Panchayat बांधकाम परवानगी तुम्ही ग्रामपंचायतमध्ये मिळून जाईल. ग्रामीण भागात बांधकाम परवानगी देण्याचे अधिकार ग्रामपंचायतला देण्यात आले आहे. ग्रामपंचायतकडून बांधकाम परवानगी कशी घ्यायची याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊ या..

Bandhkam Parvana Gram Panchayat GR महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाने 18 मार्च 2021 रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार राज्यातील जिल्हा परिषद त्यांचे मुख्याधिकारी यांना निर्देश देण्यात आले आहे की, ग्रामीण भागातील इमारत बांधकाम परवानगी अधिकार ग्रामपंचायतला देण्यात आले आहे.

युनिफाईड डेव्हलपमेंट कंट्रोल ॲड प्रमोशन रेगुलेशन मधील तरतुदीनुसार 155 चौरस मीटर ते 300 चौरस मीटरपर्यंत क्षेत्रफळ भूखंडावरील ग्रामपंचायतकडे मिळेल. हे करताना दोन मुख्य बाबींचा विचार केल्या जातो. एक म्हणजे कमी जोखीम श्रेणी दुसरी म्हणजे मध्यम जोखीम श्रेणी..

कमी जोखीम श्रेणी:- 150 चौ.मी. (1.5 गुंठा) पर्यंत भूखंड क्षेत्रावर इमारत बांधकाम
मध्यम जोखीम श्रेणी:- 300 चौ.मी. (3 गुंठा) पर्यंत भूखंड क्षेत्रावर इमारत बांधकाम

बांधकाम परवानगीसाठी आवश्यक कागदपत्रे Gram Panchayat Bandhkam Parvana

  • विहित नमुन्यातील अर्ज
  • जागेच्या मालकीची कागदपत्रे
  • मंजूर लेआऊट
  • बिल्डिंग प्लॅन
  • विकास शुल्क व उपकरण संबंधित प्राधिकरणानाकडे भरल्याची पावती
  • आर्किटेक्चरचा विहित नमुन्यातील दाखला (ग्राम पंचायत बांधकाम परवाना)

अ) बांधकाम परवानगी कर
1) जमीन विकास शुल्क – विकास शुल्क हे नगरविकास विभागानुसार
जमीन विकास शुल्क:
रहिवासी बांधकाम – भूखंड क्षेत्र जमिनीचे 1.2 टक्के चौ.मी. दर
व्यावसायिक बांधकाम – भूखंड क्षेत्र जमिनीचे 1 टक्के चौ.मी. दर (Bandhkam Parvana in Marathi)

आ) बांधकाम विकास शुल्क
रहिवासी बांधकाम – भूखंड क्षेत्र जमिनीचे रेडरेनकर प्रती चौ.मी. 2 टक्के दर
व्यावसायिक बांधकाम – भूखंड क्षेत्र जमिनीचे रेडरेनकर प्रती चौ.मी. 4 टक्के दर

तुम्हाला एकूण रक्कम भरावी लागणार..


विकास शुल्क = जमीन विकास शुल्क + बांधकाम विकास शुल्क (Gram Panchayat Bandhkam Parvana 2022)

हे दिलेले शुल्क तुम्हाला ग्रामपंचायत ग्रामनिधीमध्ये जमा करून नोंद पावती घेऊन स्वतंत्र नोंद झाली की नाही याची खात्री करून घ्यावी. हा विकास शुल्क कर झाला अजून एक ग्रामपंचायतीचा कर आहे. या कराचे नाव कामगार उपकर असे आहे. (Gram Panchayat Bandhkam Parvana in Marathi)

बांधकाम उपकर
बांधकाम उपकर = बांधकामाची किंमत 1 टक्के (बांधकाम किंमत = बांधकाम क्षेत्र रेडीरेनकर प्रती चौ.मी.)

हे देखील वाचा-


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!