Get Deleted Messages App : व्हॉट्सॲपवरचे Delete For Everyone केलेले मॅसेज वाचायचे आहेत? जाणून घ्या ही सोपी ट्रिक फक्त 2 मिनिटांत

Get Deleted Messages App : व्हॉट्सॲप हे भारतासह जगातील सर्वात जास्त वापरले जाणारे मॅसेजिंग अ‍ॅप आहे. कारण व्हॉट्सॲप हे वापरण्यास अगदी सोपे असून त्यामध्ये आपल्याला हव्या त्या सर्व सुविधा उपलब्ध आहेत. व्हॉट्सॲपवर तुम्हाला व्हॉइस कॉल बरोबरच व्हिडिओ कॉल सुद्धा करता येतो, तुमच्या मित्रांना मॅसेज पाठवू शकता, फोटो/व्हिडिओ शेअर करू शकता. या बरोबरच लोकेशन शेअर आणि पैसे पाठवण्याची सुद्धा व्यवस्था आहे.

Get Deleted Messages App
Get Deleted Messages App

पण, व्हॉट्सॲपच्या एका सुविधेमध्ये थोडी अडचण आहे, आणि ती म्हणजे डिलीटेड केलेला मॅसेज. व्हॉट्सॲपवर कोणीही पाठवलेला कोणताही संदेश मग तो टेक्स्ट असो, व्हिडिओ असो, किंवा फोटो असो हे सर्व सेंड केल्यानंतर दोन दिवसांपर्यंत डिलीट करता येतो. मात्र मुख्य समस्या ही आहे की, तो संदेश डिलीट केल्यानंतर चॅटबॉक्समध्ये “This message was deleted” असा नोटिफिकेशन दिसतो. यामुळे समोरच्या व्यक्तीने डिलीट केलेला मॅसेजमध्ये काय लिहिल होत याबद्दल वाचणार्‍याची उत्सुकता शिगेला पोहोचते.

इन्स्टाग्रामसासोबतच बऱ्याच सोशल मीडिया ॲपमध्ये सुधा मॅसेज डिलीट करण्याचा फीचर आहे, पण तिथे मॅसेज डिलीट केल्यावर रिसीव्हरला कळत नाही. त्यामुळे तरी व्हॉट्सॲपने या फीचर अजून सुधारित करण्याची गरज आहे..

मोबाईलवर व्हॉट्सॲपवरील डिलीटेड मेसेज वाचण्यासाठी हे करा

तुम्हाला सुध्दा डिलीट केलेला मॅसेज वाचायचा असल्यास तुम्हाला थर्ड पार्टी ॲपचा वापर करुन वाचू शकता.

  1. सर्वात पहिले तुम्हाला गुगल प्ले स्टोरवरून Get Deleted Messages App डाउनलोड करावे लागेल.
  2. आता त्या ॲपला व्यवस्थित काम करण्यासाठी काही परवानग्या द्याव्या लागतील त्या परवानगी द्या.
  3. आता व्हॉट्सॲपवर जेव्हा कोणीही एखादा मॅसेज डिलीट केला, तेव्हा या ॲपचा वापर करुन तुम्हाला तो मॅसेज वाचता येईल.
Get Deleted Messages App
Get Deleted Messages App

Get Deleted Messages App हे कसे काम करते

Get Deleted Messages App हे तुमच्या मोबाईलच्या नोटिफिकेशन मधील मॅसेज दाखवते. त्यामुळे या ॲपला नोटिफिकेशन वाचण्याची परवानगी द्यावी लागेल. पण जर का तुम्ही व्हॉट्सॲप चॅट ओपन ठेवली आणि त्यावेळेस एखादा मॅसेज डिलीट झाला तर मात्र तुम्हाला तो वाचता येणार नाही. कारण Get Deleted Messages app हे नोटिफिकेशनचा वापर करून मॅसेज वाचू शकते.

लक्षात ठेवा..! Get Deleted Messages app हे एक थर्ड पार्टी ॲप असून ते किती सुरक्षित आहे याची शाश्वती देता येत नाही. त्यामुळे हे ॲप वापरण्यापूर्वी कोणकोणत्या परवानग्या देत आहात याची खात्री करा.

Similar Posts