Free Ration Card online update 2024: आता घरबसल्या पब्लिक लॉगिनद्वारे ‘अशा’ पद्धतीने करा रेशनकार्ड संबंधीत सर्व कामे

Ration Card online update : रेशनकार्ड हे भारतातल्या सर्वसामान्यांच्या जीवनातील एक महत्वपूर्ण असे कागदपत्र आहे. रेशनकार्ड शिवाय बरेच कामे खोळंबून राहतात, आणि यासाठीच रेशनकार्ड संबंधितच्या कोणत्याही कामांसाठी नागरिकांना सेतू कार्यालयामध्ये सारखे हेलपाटे मारावे लागत असतात.

Ration Card online update
Ration Card online update

लग्न झाल्यानंतर शिधापत्रिकेतील पत्त्यामध्ये बदल करणे, नाव वगळणे किंवा समाविष्ट करणे अशा कारणांसाठी महिला गर्दी करीत आहेत. मात्र आता हे सर्व काम करण्यासाठी तुम्हाला थेट सेतू कार्यालयामध्ये जाण्याची गरज नाहीये.

तुम्ही घरबसल्या पब्लिक वेब लॉगिनद्वारे रेशनकार्डमध्ये तुम्हाला हवे ते बदल करू शकता. महाराष्ट्र सरकारने शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणालीमार्फत रेशन कार्डच्या लाभार्थ्यांना क्यूआर कोड आधारित ई-शिधापत्रिका (E- Ration Card) ची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यामध्ये अंत्योदय अन्न शिधापत्रिका, प्राधान्य कुटुंब योजना आणि राज्य योजनेअंतर्गत, राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना अशा सर्व शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांना विनामूल्य ही सुविधा देण्यात आली आहे.

कोटक महिंद्रा बँक महिलांना देणार 15 लाख रुपये; जाणून घ्या या स्कीमबद्दल

Ration Card online update

या सुविधेचा लाभ घेऊन नागरिकांना नवीन शिधापत्रिकेकरिता ऑनलाइन अर्ज करणे, शिधापत्रिकेतील पत्त्यामध्ये ऑनलाइन बदल करणे, नाव कमी करणे किंवा समाविष्ट करणे अशा प्रकारच्या सर्व सेवा ऑनलाइन शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणालीतर्फे पब्लिक web लॉगिनवर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

कसे करालं Ration Card online update

Ration Card online update
 • सर्वप्रथम तुम्हाला https://rcms.mahafood.gov.in/ या लिंकवर क्लिक करावे लागेल. 
 • त्यानंतर साइनअप करून नवीन रेशनकार्ड बनण्यासाठी तुमचे खाते तयार करा. 
 • यानंतर आधार क्रमांकवरील असलेली आधार क्रमांकसोबतच इतर सर्व माहिती प्रविष्ट करून नवीन खाते बनवा. 
 • यासाठी तुमचा मोबाइल नंबर हा आधार सोबत लिंक असणे अनिवार्य आहे.
 • रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यावर लॉगिन करा. 
 • आता डॅशबोर्डवर विचारलेले सर्व तपशील सविस्तरपणे भरा. 
 • ही सर्व माहिती भरल्यानंतर तुमचे रेशनकार्ड मंजुरीसाठी तहसील कार्यालयाकडे पाठविण्यात येते.
 • तुम्ही रेशन कार्डसाठी केलेला अर्जाची स्थिती ऑनलाइन तपासून पाहू शकता. अर्ज मंजूर झाल्यानंतर डिजिटल स्वाक्षरीचे ई- रेशनकार्ड उपलब्ध होईल.

रेशन कार्ड मधील दुरुस्तीसाठी ऑनलाइन प्रक्रिया

 • सर्वप्रथम तुम्हाला अन्न आणि पुरवठा विभागाच्या अधिकृत https://epds.nic.in/ या वेबसाइटवर जावे लागेल.
 • आता तुमच्या समोर ओपन झालेल्या होम पेजवर तुम्हाला “Ration Card Correction” चा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
 • आता तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल, त्या पेजमध्ये तुम्हाला रेशनकार्ड क्रमांक बरोबर आधार कार्ड क्रमांक नमूद करावा लागेल.
 • त्यानंतर “शोध” पर्यायवर क्लिक करावे लागेल.
 • इथे तुम्हाला तुमच्या रेशन कार्डची संपूर्ण माहिती दिसेल.
 • इथे तुम्हाला जो बदल करायचा असले तो बदल करावा लागेल.
 • सर्व माहिती व्यवस्थित बदलल्यानंतर तुम्हाला “सबमिट” पर्यायावर क्लिक करावे लागेल.

Ration Card online update करण्याची ऑफलाइन प्रक्रिया

जर तुम्हाला ऑनलाइन प्रक्रिया किचकट वाटत असल्यास तुम्ही ऑफलाइन प्रक्रियेचा अवलंब करू शकता.

 • यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या जवळच्या भागातील अन्न आणि पुरवठा विभागाच्या कार्यालयामध्ये जावून एक अर्ज भरावा लागेल.
 • या अर्जात तुम्हाला विचारलेली सर्व माहिती बिनचूक भरावी लागेल.
 • याशिवाय, या अर्जासोबत तुम्हाला काही आवश्यक कागदपत्रे द्यारावी लागतील.
 • अर्ज सबमिट केल्यावर तुम्हाला एक पावती दिली जाईल.

अश्या प्रकारे 30 दिवसाच्या आत तुमचे Ration Card update होऊन जाईल.

Similar Posts