राज्य कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज ! आता ‘या’ राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात केली वाढ ; वेतनात होणार मोठी वृद्धी..

State Employee News : केंद्र सरकारने ६व्या वेतन आयोगा-नुसार वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता-मध्ये जुलै २०२२ पासुन ९% वाढ लागु करण्यात आली असून,, त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांना महागाई वाढीव भत्याचा लाभ मिळावा यासाठी विधी व न्याय विभागाचा दि. २१ नोव्हेंबर २०२२ रोजी एक महत्वपुर्ण शासन निर्णय पारित केला असून राज्यातील कोणत्या कर्मचाऱ्यांना या वाढीव महागाई भत्त्याची लाभ मिळणार, याबाबतचा विधी व न्याय विभागाचा सविस्तर शासन निर्णय खालील-प्रमाणे…↓ Reels

केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालयाच्या कार्यालयीन ज्ञापना-नुसार दि. १ जुलै २०२२ पासुन लागू करण्यात आलेली ९% महागाई भत्त्यातील वाढ व ज्ञापनात नमुद इतर तरतुदी राज्यातील दुय्यम न्यायालयातील दि. १ जानेवारी २०१६ पुर्वी सेवा निवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना लागू करण्यात आला असून सदर निर्णया-नुसार राज्यातील दुय्यम न्यायालयातील दि. ०१/०१/०१६ पुर्वी सेवानिवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना दि. ०१ जुलै २०२२ पासून २१२% दराने महागाई भत्ता अनुज्ञेय राहणार असून सदर महागाई भत्ता वाढीची रक्कम रोखीने अदा करण्याचे आदेश राज्य शासनाकडुन पारित करण्यात आलेले आहे..

त्या-बरोबरच सदरील वाढीव 9% DA दि. 01 जुलै 2022 पासुन लागू करण्यात आलेला असल्यामुळे जुलै पासून ते आत्तापर्यंतचा DAची थकबाकी रक्कम सुद्धा देण्याचे आदेश देण्यात आलेले असून या संदर्भातील DA वाढीबाबतचा विधी व न्याय विभागाचा दि. 21 नोव्हेंबर 2022 रोजीचा सविस्तर शासन निर्णय (शासननिर्णय ज्याचा सांकेतांक क्र.– 202211211725221512) पाहण्यासाठी किंवा डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..

शासन निर्णय

रोजचे राशिभविष्य, ब्रेकिंग न्यूज, सरकारी व खासगी नोकरीची माहिती, सरकारी योजना व इतर महत्त्वपूर्ण अपडेटसाठी Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!