या गावात मध्यरात्री अघोरी पूजेचं प्रकरण, गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण (Aghori Puja at Midnigh)

Aghori Puja at Midnigh
Aghori Puja at Midnigh

बुलढाणा – माणसाच्या इच्छा पूर्ण व्हाव्यात यासाठी अंधश्रद्धा ठेवून अघोरी पूजा आणि नरबळी देण्याच्या घटना जन्माला घालतात. काही वेळी पैशांसाठी, तर कधी मुलगा जन्माला यावा यासाठी अंधश्रद्धेला बळी पडतात. यासाठी अनेक लोकं घरी किंवा स्मशानभूमीत जाऊन मांत्रिकाच्या म्हणण्यानुसार ( Aghori Puja at Midnigh ) विधी केला जातो. तर अशीच धक्कादायक घटना एका गावी घडली आहे. तर ह्या घटनेविषयी सविस्तर जाणून घेऊ या..

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील पारखेड गावात घडली आहे. पारखेड गावातील नागरिक अघोरी पुजेमूळे ताणतणाव आणि भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे. परंतु, आता या गावातील नागरिकांना अंधश्रद्धा निर्मूलन समितीने दिलासा दिला आहे. (Aghori Puja at Midnight in Graveyard)

पारखेड गावातील स्मशानभूमीत मध्यरात्री कुणीतरी जाऊन अघोरी पूजा केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. तर हा प्रकार सकाळी गावातील महिलांच्या समोर आल्यानंतर गावात या गोष्टीचा हाहाकार उडाला. स्मशानभूमीत हळद-कुंकूची रांगोळी मांडून केलेल्या पुजेमुळे गावात भीतीचे सावट पसरले. पारखेड गावच्या स्मशानभूमीत कोणीतरी अज्ञात लोकांनी ही अघोरी पूजा केली आहे. (Maharashtra News Today)

पारखेड गावच्या स्मशानभूमीत वेगवेगळ्या ठिकाणी लिंबू ठेवून त्यात सुया टोचून ठेवलेल्या होत्या. तसेच लिंबाच्या भोवती तांदळाचे गोल रिंगण करण्यात आले होते. मिळालेल्या माहितीनुसार, हा काळ्या जादूचा किंवा गुप्तधनाचा प्रकार असल्याचा दावा केला जातं आहे. तर काही लोकांच्या मते असे म्हणणे आहे की, गुप्तधनासाठी बळी देण्याचे प्रकरण असल्याचे सांगत आहेत. (Marathi News Today)

ही अघोरी पूजा ( Aghori Puja at Midnigh)कशासाठी केली आहे याबाबत ठोस माहिती समोर आली नाही. परंतु, पारखेड गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणाबाबत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे किशोर वाघ यांनी दखल घेऊन पोलिसांना या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणीही केली आहे. तसेच किशोर वाघ म्हणाले की, हे असे जादूटोन्याचे कृत्य कायद्यानुसार गुन्हा आहे.

Join Abdnews Whatsapp Group

हे देखील वाचा-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!