सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! लवकरच होणार पगारवाढ…

7th Pay Commission DA Hike: जून महिन्याचा AICPI निर्देशांक आला आहे, जो १२९.२ च्या पातळीवर वाढला आहे. त्यात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या वाढीमुळे या डीए वाढीचा मार्ग मोकळा झाला आहे.

तुम्ही किंवा तुमच्या घरातील कोणीही केंद्र सरकारचे कर्मचारी असाल तर ही बातमी तुम्हाला आनंद देणार आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी पुन्हा एकदा मोठी बातमी आली आहे. आता ऑगस्ट महिन्यात महागाई भत्त्यात बंपर वाढ होणार आहे. केंद्र सरकारने जून महिन्याचा AICPI निर्देशांक जाहीर केला असून तो जूनमध्ये १२९.२ वर आला आहे, तर मे महिन्यात १२९ गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने होत असलेल्या वाढीमुळे कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात किमान ४ टक्के वाढ होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात लवकरच मोठी वाढ होणार आहे. या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (DA) चार टक्के किंवा त्याहून अधिक वाढू शकतो. महागाईचे आकडे म्हणजे AICPI निर्देशांक स्पष्टपणे सूचित करतात की केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढणार आहे. डीएसोबतच इतर चार भत्त्यांमध्येही वाढ अपेक्षित आहे. अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकाच्या आधारे सरकार आपल्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वर्षातून दोनदा निश्चित करते. DA वर्षातून दोनदा म्हणजे जानेवारी आणि जुलैमध्ये निश्चित केला जातो. सरकारने जानेवारी महिन्यात महागाई भत्त्यात ३ टक्क्यांनी वाढ केली होती. या वाढीसह ते ३४ टक्के झाले होते.

वाढीनंतर महागाई भत्ता ३८ टक्के होईल
सध्या केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना ३४ टक्के डीए आणि डीआर मिळत आहे. यावेळी महागाई भत्त्यात किमान ४ टक्क्यांनी वाढ अपेक्षित आहे. त्यामुळे महागाई भत्ता ३८ टक्क्यांपर्यंत वाढणार आहे. DA आणि DR मध्ये या वाढीमुळे १.१६ कोटी केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना फायदा होईल. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता वाढीची घोषणा ऑगस्ट महिन्यात होऊ शकते.

किती वाढणार पगार
महागाई भत्त्यात ४ टक्क्यांनी वाढ अपेक्षित आहे. महागाई भत्ता मूळ पगारावर मोजला जातो. जर एखाद्या कर्मचाऱ्याचे मूळ वेतन २०,००० रुपये असेल, तर ४% DA वाढीमुळे त्याच्या पगारात ८०० रुपयांची वाढ होईल. त्याच वेळी, जर एखाद्या कर्मचाऱ्याचे मूळ वेतन १८,००० रुपये असेल, तर त्याला ३४ टक्के दराने ६,१२० रुपये डीए मिळतो. जर डीए ३८ टक्के झाला तर कर्मचार्‍यांना ६८४० रुपये महागाई भत्ता मिळेल. म्हणजेच त्याला ७२० रुपये अधिक मिळतील.

पीएफ आणि ग्रॅच्युइटी योगदान वाढेल
डीए वाढल्याने कर्मचार्‍यांचे पीएफ आणि ग्रॅच्युइटी योगदान देखील वाढते. याचे कारण म्हणजे कर्मचार्‍यांच्या मूळ पगारातून आणि डीएमधून तो कापला जातो. डीएमध्ये वाढ झाल्याने कर्मचाऱ्यांचा वाहतूक भत्ता आणि शहर भत्ता वाढवण्याचा मार्गही मोकळा झाला आहे.

Similar Posts