Driving License Online Apply: घरबसल्या ड्रायव्हिंग लायसनसाठी फक्त 2 मिनिटांत ऑनलाइन अर्ज करा; ‘How to Apply Driving Licence Online
Driving License Online Process 2024: कोणतेही वाहन चालवायचे असल्यास तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन असणे अत्यंत आवश्यक आहे. ड्रायव्हिंग लायसनशिवाय तुम्ही गाडी चलवल्यास शासन तुम्हाला दंड करते. आता तुम्ही कुठेही न जाता अगदी घरबसल्या मोबाईलद्वारे ड्रायव्हिंग लायसनसाठी अर्ज करू शकता. तुमच्या मोबाईलच्या सहाय्याने ड्रायव्हिंग लायसन काढण्याची संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या.
भारत सरकारने ड्रायव्हिंग लायसन्स काढण्याची संपूर्ण प्रक्रिया डिजिटल केली असून तुम्ही तुमच्या मोबईलवरून ऑनलाईन पद्धतीने अगदी सहजपणे वाहन चालवण्याचा परवाना मिळवू शकता. भारत सरकार कलम 4 अंतर्गत देशतील प्रत्येक नागरिकाला शिकाऊ परवाना मिळवण्याची परवानगी प्रदान करते. विशेषत: हे ड्रायव्हिंग लायसन्स वयाच्या 16व्या वर्षीच मिळते. मात्र लक्षात ठेवा, हा परवाना तुम्हाला केवळ विदआउट गेअर गाड्या चालवण्यासाठी देण्यात येतो.
जर तुम्हाला या शिकाऊ परवान्याकरिता (Lerning Licence) ऑनलाइन अर्ज करायचा असेल अथवा कायमस्वरूपी वाहन चालवण्याचा परवाना मिळवायचा असेल तर शिकाऊ परवाना तुम्हाला डिजिटल म्हणजेच ऑनलाइन पद्धतीनं मिळतो. तर कायमस्वरूपी परमनंट परवाना काढण्यासाठी आरटीओ कार्यालयात जावे लागेल.
Driving License Online Apply करण्यासाठी खालील स्टेप follow करा.
- सर्वप्रथम तुम्हाला https://sarathi.parivahan.gov.in/ या वेबसाईटला भेट देऊन तुमच्या राज्याची (State) निवड करावी लागेल
- त्यानंतर ‘लर्नर लायसन्स’ (learner license) या पर्यायावर नेव्हिगेट करून Apply for a new learner license या पर्यायाची निवड करा.
- नंतर विचारेलेली संपूर्ण माहिती व्यवस्थित भरा.
- येथे तुम्हाला आधार नंबर टाकण्याचा सुद्धा पर्याय दिसेल. त्या जागी तुमच्या आधार कार्डाचे तपशील टाकल्यावर तुमच्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी येईल.
- आलेला ओटीपी नमूद केल्यावर सर्व तपशील व्यवस्थित टाकल्यानंतर तुम्हाला पेमेंट या पर्यायाची निवड करावी लागेल.
- त्यानंतर तुम्हाला 50 रुपये फी भरल्यावर तुमचे लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स फक्त 7 दिवसांच्या आत थेट तुमच्या घरी पोस्ट द्वारे पाठवण्यात येईल.
Driving License Online Processसाठी आवश्यक कागदपत्रे
● आधार कार्ड
● पत्त्याचा पुरावा
● पत्त्याचा पुरावा (रेशन कार्ड, पॅन कार्ड, वीज बिल)
● जन्मतारीख प्रमाणपत्र (10 वी गुणपत्रिका,जन्म प्रमाणपत्र, ओळखपत्र)
● पासपोर्ट आकाराचा फोटो
● स्वाक्षरी
● शिकण्याचा परवाना क्रमांक
● मोबाईल नंबर