PM Mudra Loan Yojana 2024 : प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेअंतर्गत सरकार देणार 10 लाख रुपयांचे विनातारण कर्ज..

PM Mudra Loan Yojana 2024 : प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजना 2024 हा भारत सरकारचा एक महत्वकांक्षी उपक्रम आहे जो असंघटित क्षेत्रामध्ये रोजगाराच्या नवीन संधींना चालना देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेला आहे. या PM Mudra Loan Yojana 2024 द्वारे, केंद्र सरकार भारतातील बेरोजगार तरुणांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याकरिता आर्थिक मदत करते, जेणेकरून त्यांना स्वावलंबी बनण्यात तर मदत होईलच पण त्याचबरोबर इतर नागरिकांना सुद्धा रोजगाराचे साधन सहजरीत्या उपलब्ध होईल.

 • योजनेचे नाव – प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजना (PMLY)
 • कोणी चालू केली – केंद्र सरकारने
 • लाभार्थी – छोटे व्यापारी
 • कर्जाची रक्कम – रु. 50,000 ते रु. 10 लाख
 • अधिकृत वेबसाइट – www.mudra.org.in

जर तुम्हालाही PM Mudra Loan Yojana 2024 द्वारे कर्ज मिळवायचे असेल तर हा लेख शेवटपर्यंत वाचत राहा जेणेकरून तुम्हाला या योजनेशी संबंधित सर्व महत्त्वाची माहिती अचूक मिळू शकेल, आणि तुम्हाला कर्ज मिळण्यात कोणतीही अडचण येणार नाही.

PM Mudra Loan Yojana 2024

PM Mudra Loan Yojana 2024 अंतर्गत, व्यवसाय करण्यास इच्छुक नागरिकांना 50,000 ते 10 लाखांपर्यंतचे कर्ज मिळते, जेणेकरून त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यास आर्थिक हातभार मिळेल

पीएम मुद्रा कर्ज योजनेमध्ये तीन वेगवेगळ्या प्रकारच्या कर्जांचा समावेश असून तुम्ही तुमच्या आवडीनुसार कर्जाची निवड करून आवश्यक कागदपत्रांसह तुमच्या जवळच्या बँकेत जाऊन अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकता. 

PM Mudra Loan Yojana चे तीन प्रकार खालीलप्रमाणे..

 1. शिशू कर्ज योजना : ज्याअंतर्गत तुम्ही ₹50,000 पर्यंत कर्ज मिळवू शकता. 
 2. किशोर कर्ज योजना : ज्याअंतर्गत तुम्हाला 50 हजार ते 5 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळू शकते
 3. तरुण कर्ज योजना : ज्याअंतर्गत तुम्हाला 5 लाख ते 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते.

PM Mudra Loan Yojana Documents

 • आधार कार्ड
 • ओळखपत्र
 • पॅन कार्ड
 • पोलीस पडताळणी प्रमाणपत्र
 • बँक खाते
 • मोबाईल नंबर
 • पासपोर्ट आकाराचा फोटो

PM Mudra Loan Yojana Benefits

 • ही योजना तुम्हाला व्यवसाय सुरू करण्याची संधी देते.
 • या योजनेमुळे व्यावसायिक क्षेत्रात लोकांना जागरुकता येते.
 • याद्वारे तुम्ही तुमचा व्यवसाय वाढवू शकता आणि तुमचे उत्पन्न वाढवू शकता.
 • याद्वारे तुम्ही स्वतःचा व्यवसाय उभारून रोजगार मिळवू शकता.
 • या योजनेचा सर्वात चांगला फायदा म्हणजे यामध्ये दिलेले व्याजदर खूपच कमी आहेत.

PM Mudra Loan Yojana Banks

 • ICICI Bank
 • Axis Bank
 • Canara Bank
 • Punjab National Bank
 • Indian Bank
 • Kotak Mahindra Bank
 • Bank of India
 • Corporation Bank
 • Allahabad Bank
 • Union Bank of India
 • Federal Bank
 • UCO Bank
 • Karnataka Bank
 • Punjab & Sind Bank
 • Andhra Bank
 • Bank of Maharashtra

PM Mudra Loan Yojana Apply

 • प्रधानमंत्री मुद्रा योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू करण्यासाठी, सर्वप्रथम तुम्हाला अधिकृत वेबसाइट https://www.mudra.org.in/ ला भेट द्यावी लागेल.
 • वेबसाइटवर पोहोचल्यावर, तुम्हाला होम पेजवर शिशु, तरुण आणि किशोर असे कर्जाचे 3 पर्याय दिसतील, ज्यावर तुम्हाला तुमच्या गरजेनुसार क्लिक करावे लागेल.
 • यानंतर, प्रधानमंत्री मुद्रा योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुमच्यासमोर अर्ज उघडेल.
 • त्यानंतर तुम्हाला डाउनलोड पर्यायावर क्लिक करून अर्ज डाउनलोड करावा लागेल.
 • अर्ज डाउनलोड केल्यानंतर, तुम्हाला फॉर्मची प्रिंटआउट घ्यावी लागेल आणि सर्व आवश्यक माहिती काळजीपूर्वक भरावी लागेल.
 • फॉर्मसोबत सर्व आवश्यक कागदपत्रेही जोडावी लागतील.
 • तुमच्या जवळच्या बँकेत अर्ज सबमिट केल्यानंतर, तुमच्या फॉर्मची पडताळणी केली जाईल आणि मंजूर झाल्यास, कर्जाची रक्कम तुमच्या बँक खात्यात हस्तांतरित केली जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!