Solar Pump Scheme 2024: सरकार शेतकऱ्यांना देणार 95% अनुदानावर सौर पंप; कसा घ्यावा या योजनेचा लाभ? जाणून घ्या..

Solar Pump Scheme 2024 : भारतातील शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या समृद्ध बनवण्यासाठी भारत सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक प्रकारच्या योजनांद्वारे आर्थिक मदत करत आहे. अशीच एक केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी आणि शेतकऱ्यांसाठी अतिशय फायद्याची योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केली असून, या योजनेला “पीएम कुसुम योजना” (PM Kusum Yojana) असे नाव देण्यात आले आहे.

Solar Pump Scheme 2024
Solar Pump Scheme 2024

ही योजना भारताच्या केंद्र सरकारने सुरू केलेली अजून एक जबरदस्त सरकारी असून ज्याचा उद्देश शेतकऱ्यांना सौरऊर्जा तंत्रज्ञानाचा लाभ मिळवून देणे आहे. आणि या योजनेचे नाव “किसान ऊर्जा सुरक्षा व उत्थान अभियान” असे असून या योजनेंतर्गत देशातील शेतकऱ्यांना ऊर्जा सुरक्षा देण्याचा प्रयत्न करण्यात येतो.

Kusum Solar Pump Scheme 2024

मित्रांनो तुम्हाला सुद्धा तुमच्या शेतीसाठी सोलर पंप सिंचन सुविधा घ्यायची असल्यास तुम्हाला सोलर पंप अनुदानावर मिळेल, कारण कुसुम सौरपंप योजनेंतर्गत (Solar Pump Scheme 2024) सरकारकडून चांगले अनुदान देण्यात येत असून तुम्हाला सौर पंपासाठी फक्त 5 ते 10 टक्के खर्च करण्याची गरज आहे.

सौर पंपावर किती अनुदान मिळेल?

केंद्र सरकारच्या या योजनेंतर्गत, देशातील शेतकऱ्यांना 90% पर्यंत सबसिडी देण्यात येत आहे. ज्याद्वारे शेतकरी मित्र त्यांच्या विहिरीवर सोलर पंप बसवून शेतीला पाणी देऊ शकतील, पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना वीज येण्याची वाट पाहण्याची गरज राहणार नाही. ज्यामुळे शेतकरी आर्थिक दृष्ट्या समृद्ध होईल.

पीएम-कुसुम योजनेच्या घटक अ अंतर्गत कोण कोण पात्र आहे?

  • वैयक्तिक शेतकरी/शेतक-यांचे गट/ शेतकरी उत्पादक संस्था (FPOs)
  • सहकारी संस्था/पंचायत/पाणी वापरकर्ता संघटना (WUAS),
  • ज्या जमिनीवर प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव केलेल्या आहे ती जमिन जवळच्या वीज उपकेंद्रापासून 5 किलोमीटरच्या आत असावी.

पीएम कुसुम योजनेची अंतिम मुदत काय आहे?

पीएम-कुसुम योजना (Solar Pump Scheme 2024) ही 31 मार्च 2026 पर्यंत वाढवण्यात आली असून या योजनेच्या घटक-क अंतर्गत फीडर स्तरावरील सौरीकरण सुरू देखील करण्यात आलेले आहे. हे सौर ऊर्जा प्रकल्प नापीक, पडीक आणि लागवडीयोग्य जमिनीं व्यतिरिक्त, कुरणात आणि पाणथळ जमिनीवर सुद्धा बसवता येऊ शकतात,

पीएम कुसुम योजनेसाठी अर्ज कसा करावा? | Solar Pump Scheme 2024

  • केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री कुसुम योजनेंतर्गत सौर पंप बसवण्यासाठी तुम्ही अधिकृत वेबसाइट वर अर्ज करू शकाल.
  • कुसुम योजना 2024 अंतर्गत ऑनलाइन अर्ज करण्यासाठी, शेतकन्यांनी प्रथम ऊर्जा मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाईट pmkusum.mnre.gov.in वर जावे लागेल.
  • लॉग इन केल्यावर तुम्हाला ऑनलाइन अर्ज करण्याचा पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • आता येथे तुम्हाला फॉर्ममधील सर्व माहिती तुमच्या स्वाक्षरीसह भरावी लागेल.
  • फॉर्म मध्ये पूर्ण माहिती भरल्यावर एकदा तुम्ही भरलेली सर्व माहिती तपासून सबमिट या पर्यायवर क्लिक करा.
  • यानंतर यूजर आयडी आणि पासवर्ड तुमच्या नोंदणीकृत मोबाईलनंबरवर पाठवला जाईल,
  • सर्व माहिती अपडे केल्यानंतर, अंतिम सबमिट करा, पीएम कुसुम योजनेतील तुमचा अर्ज पुर्ण झाला.
Solar Pump Scheme 2024

कुसुम पोजनेच्या अर्जासाठी कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • अलीकडच्या काळात काढलेला फोटो
  • ओळखपत्र
  • नोंदणीची प्रत
  • बैंक खाते पासबुक
  • जमिनीची कागदपत्रे
  • मोबाईल नंबर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!