Aadhar Mobile Numbar Link | आता घरबसल्या 5 मिनिटांत करा आधार कार्डला तुमचा मोबाईल नंबर लिंक..

Aadhar Mobile Numbar Link: शासनाच्या निर्देशानुसार आधार कार्डला तुमचा मोबाईल नंबर लिंक करने अतिशय गरजेचे असून शासनाच्या विविध सेवा आणि योजनांचा घेण्यासाठी किंवा KYC करायची असल्यास, नोकरीसाठी सुद्धा आधार लिंक असलेल्या मोबाईल नंबर वर पाठविण्यात आलेल्या ओटीपीच्या माध्यमातून वेरिफिकेशन केल्यानंतरच लॉगिन करता येते.

Aadhar Mobile Numbar Link

यासाठीच आधारला मोबाईल नंबर लिंक (Aadhar Mobile Numbar Link) असणे अत्यंत आवश्यक आणि महत्त्वाचे आहे. मात्र, बऱ्याचदा नागरिकांचा मोबाईल नंबर बदललेला असतो किंवा आधारला मोबाईल नंबर लिंक केलेला नसतो अशा नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होते, तर घरबसल्या आधारला मोबाईल नंबर कसा लिंक करावा यासाठी संपूर्ण लेख वाचा..

घरबसल्या ऑनलाइन मतदान कार्ड बनवण्याची संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या

आधारला मोबाईल नंबर लिंक करण्याची प्रक्रिया ही सामान्य नागरिकांना अतिशय किचकट वाटत असून यासाठी आधार सेंटर वरती जावं लागतं. मात्र, बऱ्याच वेळा तिथे गर्दी असल्यामुळे ते काम होत नाही आणि यासाठी नागरिक या गोष्टीकडे विशेष लक्ष देत नाही त्यामुळे खूप मोठे नुकसान त्यांना सहन करावे लागते.

तर मित्रांनो आता घरबसल्या मोबाईलच्या सहाय्याने आपल्या आधारला मोबाईल नंबर लिंक कसा करावा याबद्दलची प्रक्रिया जाणून घेणार आहोत.

असा करा आधारला मोबाईल नंबर लिंक (Aadhar Mobile Numbar Link)

● सर्वप्रथम तुमच्या मोबाइल नंबरवरून 14546 या क्रमांकावर कॉल करा.
नंतर तुम्हाला तुम्ही भारतीय नागरिक आहात की एनआरआय (NRI) हा प्रश्न विचारला जाईल. त्यापैकी एक या पर्यायाची निवड करा.

● पर्याय निवडल्यावर तुम्हाला आधार कार्ड तुमच्या मोबाइल क्रमांकाशी लिंक करण्याची परवानगी मागली जाईल. तुम्ही तुमच्या मोबाइलवर 1 हा बटण प्रेस केल्यास तुमची सहमती आहे, असं मानण्यात येईल. (Aadhar Mobile Numbar Link)

● ही प्रक्रिया झाल्यावर तुम्हाला तुमचा 12 अंकी आधार नंबर प्रविष्ट करून पुन्हा 1 हा बटण दाबावा लागेल. जर का तुम्ही चुकीचा आधार नंबर टाकला असेल तर तुम्हाला दुसरा पर्याय सुद्धा मिळेल.

● नंतर एक ओटीपी म्हणजेच वन टाइम पासवर्ड तुमच्या मोबाईलवर येईल.

● नंतर आयव्हीआर (IVR) कॉल प्रक्रियेद्वारे तुमच्याकडे मोबाइल क्रमांक विचारण्यात येईल.

● त्यानंतर तुमचं नाव, जन्मतारीख आदी माहिती द्यावी लागेल.

● तुम्ही ती सगळी माहिती दिल्यानंतर आयव्हीआर तुम्ही दिलेला मोबाइल क्रमांकाचे शेवटचे चार आकडे सांगून ते बरोबर आहेत का हा प्रश्न विचारेल.

● तुमची सहमती मिळाल्यावरर तुम्ही तुम्हाला आलेला ओटीपी टाकल्यानंतर 1 दाबावा लागेल.

त्यानंतर ही प्रक्रिया पूर्ण होऊन तुमचा मोबाइल नंबर आधारशी जोडला जाईल.

आयव्हीआर (IVR) आपल्याला सांगण्यात येईल की आधार सोबत मोबाइल नंबरची पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झालेली असून प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुम्हाला एक संदेश येईल. (Aadhar Mobile Numbar Link)

या सुविधेमुळे आधारला मोबाइल नंबर लिंक करणं अगदी सहज-सोपं झालं आहे.

बाईक प्रेमींसाठी खुशखबर: Yamaha MT15 V2 वर मिळत आहे बंपर सूट; जाणून घ्या सविस्तर माहिती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!